माहिती अधिकाराची तत्परतेने अंमलबजावणी आवश्यक

औरंगाबाद : माहितीचा अधिकार 2005 मध्ये प्रत्येक बाबीसाठी कालावधी निश्चित केलेला असल्यामुळे या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यतत्परता अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंधारण विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता तथा माहिती अधिकाराचे तज्‍ज्ञ जे.के.तांबे यांनी केले.

तांबे म्हणाले की, माहिती अधिकारातील प्रत्येक अर्ज हा ठराविक कालावधीमध्येच जनमाहिती अधिकाऱ्याने निकाली काढायला हवा. जेणेकरून संबधित अर्जदाराला योग्य माहिती प्राप्त होऊन त्याचे समाधान होईल. माहिती अधिकारातील आलेला अर्ज हा त्या-त्या वेळेत निकाली न काढल्यास त्याचा भुर्दंड आणि मानसिक त्रास हा संबधित अधिकाऱ्याला सहन करावा लागतो. अर्जदाराने मागणी केलेली माहिती ही माहिती अधिकारातील कलमान्वये संबधित अर्जदाराला उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यासाठी माहिती अधिकारामध्ये असलेली महत्वाची कलमे आणि परिशिष्टांबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

यावेळी त्यांनी माहिती अधिकारातील कलम 1 ते 31 पर्यंत याबाबत सविस्तर विश्लेषण करून सांगितले. अधिकारी आणि त्यांच्या अधिकारासंबधी माहिती जनतेला देता येणे गरजेचे आहे. शासकीय कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी हा जनमाहिती अधिकारी असून कोणत्या कलमान्वये कुठली माहिती द्यावी, कुठली माहिती देता येत नाही, कुठल्या प्रकाराच्या संस्था, संघटना, कार्यालये माहिती अधिकारात येत नाहीत याबाबत तांबे यांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)