माहिती अधिकाराखालील 35 हजार अपिले प्रलंबित

राज्यातील आठ कार्यालयाची स्थिती : पुण्यात सर्वाधिक 8 हजार 987

पुणे – माहिती अधिकाराखाली केलेल्या अर्जांमध्ये समाधानकारक माहिती न देणे, माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विभागीय खंडपीठाकडे अपिल दाखल करण्यात येते. त्यानुसार राज्यात माहितीच्या अधिकाराखालील एकूण 35 हजार 315 अपिले प्रलंबित आहेत. पुणे खंडपीठाकडे सर्वाधिक अपिले प्रलंबित असून ही संख्या 8 हजार 987 इतकी आहे.

राज्यात 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांमधील हवी ती माहिती उपलब्ध मिळू लागली. या माहितीमुळे प्रशासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येवू लागली. तसेच अनेक गैरप्रकार या माहितीच्या अधिकारामुळे उघडकीस आले आहेत.

संबंधित कार्यालयांमधील अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्या विरुद्ध विभागनिहाय खंडपीठाकडे द्वितीय अपिल दाखल करण्यात येते. खंडपीठाचे माहिती आयुक्त यावर सुनावणी घेऊन आदेश जारी करतात. राज्यात पुणे, कोकण, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती आणि बृहन्मुंबई अशी खंडपीठे आहेत. तर, मुख्य माहिती आयुक्त कार्यालय हे मुंबई आहे. या आठही कार्यालयांमध्ये 35 हजार 315 अर्ज प्रलंबित आहेत. मुंबई मुख्यालय येथे 6 हजार 760, बृहन्मुंबई येथे 601, कोकण खंडपीठाकडे 3 हजार 213, पुणे खंडपीठाकडे 8 हजार 987, औरंगाबाद येथे 580, नाशिक येथे 7 हजार 229, नागपूर येथे 611 आणि अमरावती खंडपीठाकडे 7 हजार 334 अपिले प्रलंबित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)