माहितीसाठी बेबसाईट तयार करण्याच्या सूचना

उच्चस्तरीय संनियंत्रक समितीच्या बैठकीत तक्रारींचा पाढा

महाबळेश्वर, दि. 3 (प्रतिनिधी) – स्थानिक जनतेच्या माहितीसाठी वेबसाईट तयार करावी. त्यावर उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या कामाकाजाची व बैठकीची माहिती द्यावी. या वेबसाईटवर जनतेला थेट तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उच्चस्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना केली. वेबसाईट मुळे समितीचे काम अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला. या वेळी खा. उदयनराजे भोसले व जिल्हा पालिस निरीक्षक पंकज देशमुख हे ही उपस्थित होते.

राजभवन येथे उच्च स्तरीय सनियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी आयोजित केलेल्या खुल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी उच्चस्तरीय सनियंत्रण समितीचे सदस्य डॉ. राहुल मुनगीकर यांच्यासह सहप्रांताधिकारी संगिता चौगुले, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे बाबासाहेब कुकडे, तससिलदार मिनल कळसकर, बाळासाहेब भिलारे, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आदी मान्यावरांसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष पटवर्धन म्हणाले की नागरिकांचे म्हणणे ऐकल्या नंतर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या क्षेत्रा बाबत पुरेसी माहिती जनते पर्यंत पोहचलेली दिसत नाही. क्षेत्र घोषित झाल्या नंतर काय करता येते आणि कशावर बंधने आहेत या बाबत लोकांना माहितीच नाही. ती त्यांना मिळालीच पाहीजे. या साठी महाबळेश्वर व पांचगणी या दोन्ही पालिकांनी प्रवासीकरातील रक्कमेतुन मराठी भाषेत माहिती पुस्तिका तयार करावी व त्याचे वितरण करून या बाबत जनजागृती करावी. या पुस्तीकेत अत्यंत सोप्या स्थानिक बोलीभाषेचा वापर करण्यात यावा. समिती स्थानिक लोकांच्या विरोधात नाही. समितीचे कामकाज अतिशय सकारात्मक पध्दतीने सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या वेळी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले , इको सेन्सेटिव्ह झोन , बफर झोन , व्याघ्र प्रकल्प , पश्‍चिमघाट , हेरीटेज समिती अशा अनेक समितीने जगणे मुश्‍लिक केले असतानाच आता या मध्ये हरीत लवादाची भर पडली आहे. त्या मुळे स्थानिक लोकांमध्ये मोठा असंतोष परसत चालला आहे. लोकांची जर उपासमार झाली तर त्यांना चोरी करणे भाग पडेल. मग अशा स्थितीत येथे कायदा आणि सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण होईल. गावठाण विस्तार नाही चटई क्षेत्रात वाढ नाही. त्या मुळे मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत चालली आहेत. याला जबाबदार कोण असा सवालही खा. उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
या चर्चासत्रात बाळासाहेब भिलारे म्हणाले की स्थानिकांना विश्वासात न घेता हरीत लवादाने 33 लोकांना थेट अटक वॉरंट काढले . या 33 पैकी 20 जणांचे हातावरचे पोट होते. त्यांना थेट दिल्लीत सुनावणीसाठी बोलविण्यात आले .यात स्थानिक गरीबांवर नियमांचा आसूड ओढला जातो. त्या मुळे स्थानिक लोक स्थलांतर करू लागले आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर , राजेश कुंभारदरे , आशोक गायकवाड , वेळी हरीभाऊ सपकाळ, विजय नायडू , दिलीप कांबळे, जयदिप कांबळे यांनीही विविध समस्या आणि अडचणींवर मत व्यक्त करत तांत्रिकतेच्य अडचणी दूर करण्या संदर्भात मत मांडले.
या चर्चासत्रासाठी वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड , पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे , आगार व्यवस्थापक पतंगे, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे , नगरसेविक संदीप साळुंखे , पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)