माहितीच्या गैरवापराबद्दल फेसबुकला 5 लाख पौंडांचा दंड

ऑस्ट्रेलियामध्येही भरपाईची मागणी

लंडन – फेसबुक वापरणाऱ्या ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून ब्रिटनमधील नियामक प्राधिकरणाने फेसबुकला तब्बल 5 लाख पौंडांचा दंड होणार आहे. युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या मुद्दयावर ब्रिटनमध्ये 2016 साली झालेल्या सार्वमतादरम्यान फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर झाल्याच्या आरोपात तथ्य आढळल्याने फेसबुकला हा दंड ठोठावला जाणार आहे.

यावर्षाच्या सुरुवातीपासून माहिती आयुक्त कार्यालयाकडून फेसबुकची चौकशी करण्यात येत होती. फेसबुकच्या ऍपच्या माध्यमातून जगभरातील लाखो ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे “डाटा प्रोटेक्‍शन ऍक्‍ट’अंतर्गत फेसबुकला जास्तीत जास्त दंड केला जाईल, असे नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियामध्येही भरपाई द्यावी लागणार
ऑस्ट्रेलियामध्ये गोपनीय माहितीच्या उल्लंघनाच्या आरोपावरून फेसबुकला जबरी भरपाई द्यावी लागण्याची शक्‍यता आहे. एप्रिल महिन्यात फेसबुकने जगभरातील 87 लाख ग्राहकांच्या माहितीचा गैरवापर झाल्याचे मान्य केले होते. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातील 3 लाख जणांची माहिती केंब्रिज ऍनालिटीकाने वापरली होती. ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्व संस्था, संघटनांनी घेणे आवश्‍यक आहे.

आयएमएफ बेन्थाम या कंपनीने ऑस्ट्रेलियातील माहिती आयुक्‍तांकडे फेसबुकविरोधात तक्रार दाखल केल्याने फेसबुकवर ही भरपाई देण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)