मास्टर ब्लास्टर सचिनने घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी सचिन अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सचिन तेंडुलरकच्या आयुष्यावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम्स येत्या 26 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती.
पंतप्रधानांसोबतच्या भेटीचा फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केला आहे. सचिन अ बिलियन ड्रीम्स बद्दल पंतप्रधानांना सांगितले आणि मोदींनी शुभेच्छा दिल्या, असे ट्‌वीट मास्टरब्लास्टरने केले आहे. जो खेले वही खिले, हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधानांनी या भेटीत दिल्याचेही सचिनने सांगितले. यासाठी त्याने मोदींचे आभारही मानले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही सचिनसोबतच्या भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. सचिन तेंडुलकरसोबत चांगला वेळ घालवला. त्याचा जीवन प्रवास आणि कामगिरी 125 कोटी भारतीयांसाठी अभिमानस्पद आणि प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटलें आहे. सचिन तेंडुलकर राज्यसभेचा खासदारही आहे. सचिनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स एर्स्किन यांनी केले आहे. या चित्रपटात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)