‘मास्क’ वापरताय; सावधान!

स्वाईन फ्लूची धास्ती : अधिकवापराचा मास्क धोकादायक
पिंपरी – शहरात स्वाईन फ्लू’च्या फैलावामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संसर्गजन्य आजारामुळे शहरात सरकारी व खासगी रुग्णालयात तोंडाला मास्क लावलेले नागरिक दिसून येत आहेत. मात्र, मास्क सहा तासाहून अधिक वापरणे धोकादायक असून वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे. कालावधीपेक्षा अधिक तास मास्क वापरल्यास विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. यामुळे, नागरिकांनी बहुतांशी प्रमाणात तोंडाला मास्क न वापरता कापडी रुमालाच अथवा कापडी मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे.

राज्यभरात स्वाईन फ्लू’ने कहर केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, नगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये संसर्जगन्य आजाराने थैमान घातले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लू’ने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. या आजाराच्या फैलावामुळे स्वसंरक्षणासाठी तोंडाला मास्क लावून या जीवघेण्या विषाणूंपासून रोखण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. यामुळे, शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात पेशंट, नातेवाईक मास्क वापरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही लोकांना मास्कबाबत निश्‍चित माहिती नसल्याने आठवडाभर एकच मास्क वापरत असल्याची धक्कादायक स्थिती आढळून आली आहे. याबाबत, नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. मेडीकल स्टोअरमध्ये विकले जाणारे मास्क तीन ते सहा तास वापरणे योग्य असतात. त्यानंतर, मास्कवर विषाणू जमा होण्यास सुरुवात होते. हा आजार संसर्गजन्य असल्याने मास्कवरील विषाणूंचा इतरत्र फैलाव होऊन या आजाराची लागण दुसऱ्याला होण्याची शक्‍यता असते. मास्क हे नागरिकांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी उपयोगी असतात. तसेच, नागरिकांनी रुग्णालयात कापडी मास्क वापरणे आवश्‍यक आहे.

-Ads-

स्वसंरक्षणासाठी असणारे साधे मास्क धोकादायक असून त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. तसेच, रुग्णालयात जाताना नागरिकांनी कापडी रुमाल अथवा कापडी मास्कचा वापर केल्यास योग्य ठरेल. त्याच मास्कचा वापर पुन्हा करावयाचा असल्यास तो धुऊन निर्जंतुक करण्याची आवश्‍यकता असल्याचे, डॉ. सुनिता काळे यांनी सांगितले.

कोट :
नागरिकांनी मास्क न वापरता कापडी रुमालाचा वापर करावा. सध्या, शहरात संसर्गजन्य आजार पसरल्याने रुग्णांनी अथवा नातेवाईकांनी कापडी रुमाल वापरुन नंतर तो गरम पाण्यात धुतल्यानंतर पुन्हा वापर करावा. जेणेकरुन या आजाराच्या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होईल.
– डॉ. के. अनिल रॉय : मुख्य आरोग्य अधिकारी, वैद्यकीय विभाग, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)