मासेमारी करणाऱ्या नौकेला अपघात : तीन मच्छीमार ठार तर नऊ जण बेपत्ता

कोची – येथील मुनांबन गावा लगतच्या समुद्रात एका मासेमारी करणाऱ्या नौकेला व्यापारी जहाजाने धडक दिल्याने ती नौका बुडाली असून त्यातील तीन मच्छीमारांचा मृत्यु झाला असून दोन जखमी झाले आहेत तर अन्य नऊ मच्छीमार बेपत्ता झाले आहेत.

14 मच्छीमारांना घेऊन समुद्रात मासे पकडायला गेलेल्या या नौकेला 24 नॉटिकल अंतरावर असताना दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान एका व्यापारी जहाजाने धडक दिली या धडकेने ती नौका पलटली ज्यामुळे त्या वरिल वरिल सर्व मच्छीमार समुद्रात वाहुन गेले. यावेळी त्या व्यापारी जहाजाने मच्छीमारांना मदत करायची सोडुन त्या ठिकाणाहुन पळ काढला असे बचावकर्त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पलटलेल्या नौकेवरिल दोन मच्छीमारांच्या मृतदेहांना कोस्टमध्ये आणण्यात आले आहे तर दोन जखमी मच्छीमारांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. अपघातातील नऊ जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. माहितीनुसार, या बोटीत तमिळनाडूतील 11 मच्छीमार, पश्‍चिम बंगालमधील दोन आणि केरळमधील एक मच्छीमार होता.

बचाव कार्यासाठी नौदलाकडे मदत मागीतली असून नौदलाने आपले सी किंग हेलिकॉप्टर या बचाव मोहिमेसाठी पाठवले असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याच बरोबर या बचाव कर्यात एका डॉर्नियर विमानाची ही मदत घेतली जात आहे, तर आणखी एका विमानाला त्या घटने मधिल व्यापारी जहाजाच्या शोधात पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

यावेळी नौदलाची आयएनएस जमुना देखील बेपत्ता मच्छिमारांच्या शोधासाठी व बचाव मोहिमेसाठी रवाणा करण्यात आली आहे. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये ओळखल्या जाणारी व्यापारी नौका नोंदणीकृत आहेत त्यामुळे या घटनेत सामील असलेल्या व्यापारी जहाजाची ओळख पटली असून, चौकशीनंतरच याची पुष्टी केली जाऊ शकते.

दरम्यान, दक्षिण नौदल कमांड अंतर्गत कोची येथे संयुक्त ऑपरेशन सेंटर संपूर्ण ऑपरेशनची देखरेख करीत आहे. अश्‍याच एका घटनेत 7 जून रोजी एका परदेशी नौकाने समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या एका नौकेला धडक मारली होती ज्यात दोन मच्छीमार जखमी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)