मासळी, मटण, चिकन आणि अंड्याला मागणी वाढली

संग्रहित छायाचित्र

पुणे-गणेशोत्सवानंतर मासळी, मटण, चिकन आणि अंड्याला मागणी वाढली आहे. विशेषत: समुद्रातील मासळीला जास्त मागणी आहे. त्यामुळे त्या मासळीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, मागणी अभावी नदीतील मासळीचे भाव 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घटले आहेत. चिकनच्या भावात किलोमागे 20 रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश आणि गावरना अंड्याच्या भावात शेकड्यामागे 15 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भाव मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची 10 टन, खाडीच्या मासळीची 400 ते 500 किलो, नदीच्या मासळीची 1 टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 10 ते 12 टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1400 -1500, मोठे : 1400 -1500, मध्यम : 800- 850 लहान : 550 -600, भिला : 500 -550, हलवा : 400 -480, सुरमई : 400 -480, मोठे 600, रावस – लहान :550, मोठे 650 घोळ : 480, करली : 240, भिंग : 180-240, पाला : 700-800 वाम : पिवळी लहान 240 मोठे 400-480, काळी : 200, ओले बोंबील : लहान 50-60, मोठे 100-120, कोळंबी ः लहान : 240, मोठी : 360-400 जंबोप्रॉन्स :1400, किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1400, मोरी : लहान 160-180, मोठे 200-240, मांदेली : 100-120 राणीमासा :160-180, खेकडे : 160-200, चिंबोऱ्या : 400-440, खाडीची मासळी : सौंदाळे : 200, खापी : 160, नगली : लहान 200 मोठी 400, तांबोशी : 360, पालू : 200, लेपा : लहान 120, मोठे 200, शेवटे : लहान 120-140 मोठे 240 बांगडा : लहान 120 -140 मोठा 160-200 ,पेडवी : 30, बेळुंजी : 100, तिसऱ्या : 160 खुबे : 120, तारली : 100-120 नदीची मासळी : रहू : 140, कतला :160, मरळ : लहान 280, मोठी 360, शिवडा : 140 चिलापी : 50-60, मागुर : 80, खवली :180, आम्ळी : 80 खेकडे : 160, वाम : 400. मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 500. चिकन : चिकन : 150, लेगपीस : 180, जिवंत कोंबडी : 120, बोनलेस : 260. अंडी : गावरान : शेकडा : 640, डझन : 90 प्रति नग : 7.5. इंग्लिश : शेकडा : 379 डझन : 60 प्रतिनग : 5.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)