गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत सामसूम
पुणे-गणेशोत्सवामुळे मासळी, मटण आणि चिकनला कमी मागणी आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर मटण, चिकनचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. गणेशोत्सवानंतर मासळीची मागणी आणि भाव वाढेल, असा अंदाज व्यापारी ठाकूर परदेशी यांनी वर्तवली आहे. रविवारी (दि. 16) खोल समुद्रातील मासळीची सुमारे 8 ते 10 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 100 ते 200 किलो आणि नदीतील मासळीची 500 ते 800 किलो इतकी आवक झाली. आंध्रप्रदेशात येथून रहु, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 7 ते 8 टन इतकी आवक झाली. मागणीत वाढ झाल्याने गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावांत शेकड्यामागे 10 ते 40 रुपयांनी वाढ झाली.
भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : 1300-1400, मोठे : 1400, मध्यम : 800, लहान : 550-600, भिला : 400,
हलवा : 400-440, सुरमई : लहान : 300-360, मोठी : 480, रावस : लहान : 440, मोठा : 520- 550, घोळ : 480, करली : 280, भिंग : 280, पाला : लहान 400 मोठे 800, वाम : पिवळी : 360-440, काळी : 280, ओले बोंबील : लहान : 60, मोठे : 100, कोळंबी : लहान : 200, मोठी : 400, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 700, लॉबस्टर : 1200, मोरी : लहान 160, मोठे 240, मांदेली : 100, राणीमासा : 160, खेकडे : 160-200, चिंबोऱ्या : 360-400,
खाडीची मासळी : सौंदाळे : 200, खापी : 200, नगली : लहान : 240, मोठी : 550, तांबोशी : 360, पालू : 200, लेपा : लहान 120, मोठे 200, शेवटे : 200, बांगडा : लहान : 120, मोठा : 160, पेडवी : 40, बेळुंजी : 120, तिसऱ्या : 140 -160, खुबे : 100, तारली : 100, नदीची मासळी : रहू : 120-140, कतला : 140-160, मरळ : 240-280, शिवडा : 100-140, चिलापी : 40-60, मांगूर : 80-100, खवली : 120-160, आम्ळी : 60-80, खेकडे : 100-160
वाम : 400-480. मटण : बोकडाचे : 480, बोल्हाईचे : 480, खिमा : 480, कलेजी : 520. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 670, डझन : 90, प्रति नग : 7.50, इंग्लिश : शेकडा : 395, डझन : 60, प्रतिनग : 5.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)