पुणे-श्रावण महिना संपल्यामुळे मटण, मासळी, चिकन आणि अंडी यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, पुढील दोन दिवसच ही मागणी असणार आहे. त्यामुळे गरजेनुसारच व्यापारी मालाची आवक करीत आहेत. बुधवारी हरितालिका आहे. तर गुरूवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे त्या कालावधीत मागणी नसेल, असे व्यापारी ठाकुर परदेशी यांनी सांगितले.
रविवारी (दि. 9 सप्टेंबर) गणेश पेठेतील घाऊक बाजारात पूर्व आणि पश्‍चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक होत आहे. खोल समुद्रातील मासळीची सुमारे 7 ते 8 टन, खाडीच्या मासळीची सुमारे 400 ते 500 किलो आणि नदीतील मासळीची 700 ते 800 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहु, कतला, सिलनची मिळून सुमारे 8 ते 10 टन इतकी आवक झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मासळी, मटण आणि चिकनचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर मागणी वाढल्यामुळे गावरान आणि इंग्लिश अंड्याच्या भावांत प्रति शेकड्यामागे 30 ते 40 रुपयांनी वाढ झाली आहे.
भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : 1300-1400, मोठे : 1400, मध्यम : 750-850, लहान : 550-650, भिला : 400-500, हलवा : 400-480. सुरमई : लहान : 360-400, मोठी : 500-550, रावस : लहान : 480-550, मोठा : 650, घोळ : 550. करली : 280-320, भिंग : 280, पाला : 700-800, वाम : पिवळी : 320-360, काळी : 240-280,
ओले बोंबील : लहान : 80, मोठे : 100-120, कोळंबी : लहान : 160-200, मोठी : 400-440, जंबोप्रॉन्स : 1200, किंगप्रॉन्स : 650-750, लॉबस्टर : 1200, मोरी : 200, मांदेली : 100, राणीमासा : 160, खेकडे : 180, चिंबोऱ्या : 400-440, खाडीची मासळी : सौंदाळे : 240-280, खापी : 160-200, नगली : लहान :200-240, मोठी : 400-440, तांबोशी : 300, पालू : 200, लेपा : 100-200, शेवटे : 120-240, बांगडा : लहान : 100 – 120, मोठा : 160-180, पेडवी : 40, बेळुंजी : 100, तिसऱ्या : 160, खुबे : 120, तारली : 100, नदीची मासळी : रहू : 120, कतला : 140, मरळ : 280, शिवडा : 140, चिलापी : 40-50, मांगूर : 80, खवली : 140, आम्ळी : 60, खेकडे : 120, वाम : 400.
मटण : बोकडाचे : 480, बोल्हाईचे : 480, खिमा : 480, कलेजी : 520. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 240. अंडी : गावरान : शेकडा : 650, डझन : 90, प्रति नग : 7.50, इंग्लिश : शेकडा : 370, डझन : 54, प्रतिनग : 4.50.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)