मासळी, चिकन, इंग्लिश अंड्याच्या भावात वाढ

पुणे – मासळीला मागणी चांगली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 5 ते 10 टाक्‍यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटणाचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मागणी वाढल्यामुळे चिकनच्या भावात किलोमागे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. अंड्यामध्ये गावरान अंड्याचे भाव स्थिर आहेत. तर इंग्लिश अंड्यांच्या भावात शेकड्यामागे सुमारे 20 रूपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील 12 ते 14 टन, खाडीच्या मासळीची सुमारे दोनशे ते अडीचशे किलो, नदीच्या मासळीची सुमारे दीड ते दोन टन इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून 10 ते 12 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1600, मोठे : 1400, मध्यम : 900-1000, लहान : 800-900 भिला : 600, हलवा : 650-700, सुरमई : 650-700, रावस-लहान : 650, मोठा : 750-800, घोळ : 650, करली : 320, करंदी : सोललेली : 320, भिंग : 280, पाला : 600-1200, वाम : पिवळी 360, मोठी 600 काळी 240, ओले बोंबील : 160-200, कोळंबी ः लहान : 240, मध्यम :360, मोठी : 480, जंबोप्रॉन्स :1500, किंगप्रॉन्स : 900, लॉबस्टर : 1400, मोरी : 200-320, मांदेली : 120, राणीमासा : 200, खेकडे : 200, चिंबोऱ्या : 400, खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 200, नगली :200-400, तांबोशी : 400, पालू : 240, लेपा : 160-200, शेवटे : 240, बांगडा : लहान : 140, मोठे : 10 -200 ,पेडवी : 60, बेळुंजी : 140, तिसऱ्या : 180-200 खुबे : 160, तारली : 120 नदीची मासळी : रहू : 140, कतला : 160, मरळ : लहान : 280, मध्यम : 440, शिवडा : 200, चिलापी : 60, मागुर : 140, खवली : 180, आम्ळी : 60 100 खेकडे : 180, वाम : 520 मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 480. चिकन : चिकन : 140, लेगपीस : 170, जिवंत कोंबडी : 110, बोनलेस : 250. अंडी : गावरान : शेकडा : 600, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 330 डझन : 48 प्रतिनग :4

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)