मावस बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावास बेड्या

मंचर- मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मोलमजुरीसाठी आलेल्या मावसभावाने अल्पवयीन मावस बहिणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहुन तीला अपत्य झाले आहे. त्यामुळे मंचर पोलीस ठाण्यात मावस भावावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.
मेंगडेवाडी येथे संबधित पीडितेचे आई-वडील पाच वर्षांपासून शेतीकाम करीत आहे. संबंधितीचा पाहुण्यास त्यांचा मुलगा हे एकत्रित राहुन शेतीकामे करायचे. 20 जुलै 2018 रोजी पीडितेच्या पोट अचानकपणे दुखायला लागले.त्यावेळी मंचर उपजिल्हा रूग्णालयात संबंधित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले अन्‌ त्याच दिवशी तिची प्रसुती झाली. त्यानंतर तिचे पालक, नातेवाईकांनी विचारले असता तिने मावस भावापासून हे अपत्य झाल्याचे सांगितले.परंतु घरातील सर्व नातेवाईक एकत्र बसुन त्यांची पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची तयारी नव्हती.परंतु डॉक्‍टरांनी मंचर पोलिस ठाण्यात फोन करून अल्पवयीन मुलगी प्रसुती झाल्याचे सांगितले.त्यानुसार मंचर पोलिसांनी या घटनेची माहिती घेतली. त्यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी मंचर पोलीस ठाण्यात मावसभावाच्या विरोधात फिर्याद दिली असून मंचर पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)