मावळ, शिरुरवर भाजपचा “डोळा’

File photo

पिंपरी – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने जुळवाजुळव केली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघातही भाजपच्या उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, या दोन्ही मतदार संघात आमचे काम जोरदार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

भाजपने लोकसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पक्षकार्याचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांचा मेळावा वाल्हेकरवाडी-चिंचवडमधील आहेर गार्डन येथे शुक्रवारी (दि. 26) झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्याची इर्षा मनाशी बाळगून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. व्यासपीठावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, विजय काळे, सुरेश हळवनकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचर्णे, सचिन पटवर्धन, आझम पानसरे, महापालिकेतील पक्षनेते एकनाथ पवार, उमा खापरे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित आहेत.

राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेसोबत भाजपचा सलोखा कमी झाला आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे भाजपवर विविध मुद्यांवर जाहीरपणे टीका करीत आहेत. आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा देऊन ठाकरेंनी भाजपची अस्वस्थता वाढवली आहे. त्यामुळे सावध भूमिका घेत भाजपनेही स्वबळाची तयारी केली आहे.

…त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय!
प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबाबत अद्याप भाजपचा “फॉर्म्युला’ ठरलेला नाही. जोपर्यंत “फॉर्म्युला’ ठरत नाही. तोपर्यंत आम्ही सर्वच लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहोत. युतीसाठी समविचारी पक्षाने आमच्यासोबत चर्चा करण्याची तयारी दाखवावी. त्यानंतर लोकसभेच्या त्यांच्या जागा त्यांना देण्याबाबत विचार होईल.

तीन नोव्हेंबरला प्रचाराचा शुभारंभ
भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात आपली ताकद दाखवून देतील. पिंपरी-चिंचवड शहरात जे पिकते ते राज्यभर खपते. शहरातून राज्याची राजकीय हवा तयार होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरच्या सभेत प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे’, असेही जगताप यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)