मावळ तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यापर्यंत शासकीय योजना आणू – आमदार भेगडे

महागाव गणातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
पवनानगर – मावळ तालुक्‍यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे मत आमदार बाळा भेगडे यांनी व्यक्‍त केले.

आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून (दि. 25 ते 2 जून) मावळ तालुक्‍यातील विविध गणातील विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटण संपन्न होणार आहे यामध्ये आज महागाव गणातील विविध विकासकामांचे भूमीपुजने व उदघाटणे संपन्न झाली यावेळी आमदार बाळा भेगडे बोलत होते. सकाळी बऊर येथे बऊर ते थुगाव रस्त्याचे पूर्ण जालेल्या रस्त्याचे उद्‌घाटन भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, अशोक शेडगे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, माजी सभापती ज्ञानेश्‍वर दळवी, एकनाथ टिळे, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, जितेंद्र बोत्रे, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, निकिता घोटकुले, गणेश धानिवले, पवना कृषकचे अध्यक्ष किसन घरदाळे, बबन कालेकर, किसन खैरे, लक्ष्मण भालेराव, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर, अनिल साबळे, सरपंच सुरेखा जाधव, मारुती तिकोणे, खंडुजी तिकोणे, मधुकर काळे, नवनाथ ठाकर, सचिन मोहिते, रमेश आडकर पोलीस पाटील सतीश ठाकर, शिवाजी सुतार, दत्तु ठाकर, नवनाथ ठाकर, बाळासाहेब ढोरे, जयवंत घारे, काशिनाथ डोंगरे यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार बाळा भेगडे म्हणाले की, तालुक्‍यातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र शासन व राज्यशासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी कटिबद्ध मावळ तालुक्‍यातील जनतेसाठी रस्ते, पाणी व वीज या मुलभूत सुविधा देऊन मावळचा शाश्‍वत विकास केला जाईल, तसेच मावळच्या जनतेने जो 25 वर्षे विश्‍वास दाखविला तो सार्थ ठरवून मावळ तालुका एक आदर्श मॉडेल करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)