मावळ तालुका निवड चाचणी आणि सीएम चषक कुस्ती स्पर्धेत दिडशे कुस्तीपटू सहभागी

लोणावळा – मावळ तालुका निवड चाचणी आणि सी. एम. चषक कुस्ती स्पर्धेत विकास येनपुरे, संदीप गराडे यांनी महाराष्ट्र केसरी गटात, तर विपुल आडकर, अतिश आडकर, वैष्णव आडकर, अभिषेक हिंगे, तुषार येवले, सुरेश आडकर, आकाश पडवळ, अक्षय कारके, अनिल कडू, केतन घारे, समीर घारे, संजय आडकर, प्रतीक शिंदे, राकेश सुतार, संकल्प चांदेकर, तेजस कारके, ओंकार भोते, अमित सुतार, कौशल घोटकुले यांनी वेगवेगळ्या वजन गटात विजेतेपद पटकावले. सुरेश आडकर हा सी.एम. चषकाचा मानकरी ठरला. विजेता संघ वाघोली येथील पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी जाईल.

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या आढे ग्रामस्थ व मावळ तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वतीने कै. गोविंद कारके यांच्या स्मरणार्थ मावळ तालुका निवड चाचणी व सी. एम. चषक कुस्ती स्पर्धा आहेत. दीडशे कुस्तीपटूंनी स्पर्धेत भाग घेतला. ऑलिम्पिक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सहयोगी उपाध्यक्ष मारुती आडकर यांनी उद्‌घाटन केले. ज्येष्ठ नेते पै. चंद्रकांत सातकर, जिल्हा परिषद नितीन मराठे, भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, उपाध्यक्ष अविनाश गराडे, नगरसेवक सुनील शेळके, संदीप शेळके, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, उपाध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, पै. तानाजी कारके, पै. अंकुश सुतार, सुभाष ठाकर, गणपत कारके, गणेश सुतार यांच्या हस्ते करण्यात आले, तर बक्षिस समारंभ पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जितेंद्र बोत्रे, गणेश भेगडे यावेळी हजर होते. ऑलिम्पिकवीर पै. मारुती आडकर यांना क्रीडा महर्षि व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. खंडू वाळुंज यांना युवा क्रीडारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

-Ads-

स्पर्धेचा निकाल : प्रथम, द्वितीय : कुमार विभाग 14 वर्षाखालील – 25 किलो – संकल्प चांदेकर – आढले खुर्द, अथर्व गायकवाड – चांदखेड, 28 किलो – तेजस कारके – आढे, सनी ननावरे – टाकवे, 32 किलो – ओंकार भोते – परंदवडी, सुमित आडकर – शिवली, 35 किलो – शिंदे – टाकवे, पवन भोईर – आढले खुर्द, 38 किलो – कौशल घोटकुले – आढले बुद्रूक, प्रणव चांदेकर – आढले खुर्द, 42 किलो – वैष्णव आडकर – शिवली, सुजल वाळुंज – शिवणे.

कुमार विभाग : 17 वर्षाखालील : 45 किलो – अभिषेक हिंगे – पिंपळखुटे, आदित्य सावंत – गोडुंब्रे. 48 किलो – राकेश सुतार – आढे, सतीश मालपोटे – फळणे. 51 किलो – समीर घारे – येलघोल. मयूर काकडे – टाकवे. 55 किलो – विपुल आडकर -शिवली, गौरव भेगडे – तळेगाव. 60 किलो – दिलीप कालेकर – काले, सोहम जांभुळकर – जांभुळ, 65 किलो – विकास भांगरे -मळवंडी ठुले, दीप शेटे – नाणे, 71 किला – ओंकार गराडे – धामणे, शंभुराज पोटे – तळेगाव. 80 किलो – नयन गाडे – कान्हे, अंकित करवंदे – कल्हाट. 92 किलो – संजय आडकर – शिवली, अनिकेत आडकर – शिवली. 110 किलो – सागर शेलार – कार्ला.

वरिष्ठ माती विभाग : 57 किलो – केतन घारे – सडवली, रोहन जगताप – कशाळ, 61 किलो – अमित सुतार – आढे, शुभम शेलार – भाजे. 65 किलो – भाऊ आखाडे – शिळींब, श्रीकांत सावंत – गोडुंब्रे. 70 किलो – संकेत रसाळ – शिवणे, अक्षय पिंगळे – टाकवे. 74 किलो – नागेश राक्षे – सांगवडे, विशाल येवले – शिवली. 79 किलो – तुषार येवले – आढले खुर्द, सागर आडकर – शिवली. 86 किलो – सुरेश आडकर – शिवली, संदीप आखाडे – शिळींब. 92 किलो – खंडू कालेकर – काले, प्रवीण राजीवडे – आंबेगाव. 97 किलो – किरण घाडगे – माळेगाव, शुभम गराडे – धामणे.

86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी गट) – विकास येनपुरे – येलघोल. वरिष्ठ गादी विभाग : 57 किलो – आकाश पडवळ – नवलाख उंब्रे, शुभम कालेकर – काले. 61 किलो – विजय सुतार – आढे. 65 किलो – अतिष आडकर – शिवली, चेतन ठाकूर – उर्से. 70 किलो – प्रतीक शिंदे – वारंगवाडी, दिनेश ठुले – मळवंडी ठुले. 74 किलो – अनिल कडू – वारू, शुभम ठाकूर – उर्से. 79 किलो – प्रदीप तुपे – गेव्हंडे, मयुर पिंजण – किन्हई. 86 किलो – वैभव माळी – शेलारवाडी, अनिकेत बोऱ्हाडे – ब्राम्हणवाडी. 92 किलो – अक्षय कारके – आढे, ज्ञानेश्‍वर ठाकर – औंढोली. 97 किलो – समीर शिंदे – उर्से, विश्‍वनाथ येवले – पाचाणे. 86 ते 125 किलो – महाराष्ट्र केसरी गट – संदीप गराडे – पिंपळखुटे, महादेव मोरे वारंगवाडी.
मुलींमध्ये संस्कृती येवले, समृद्धी भोसले, रुपाली ठोंबरे, जागृती साठे, गौरी राजगुरू, सावरी सातकर, उत्कर्षा चव्हाण, ऋतुजा आरसुले, प्रियंका पवार, सरस्वती थापा, गुड्डी शिंदे, तनिष्का गायकवाड, विशाखा लोहर, भक्‍ती जांभुळकर, सिद्धी ढोरे, मोनिका गाडे यांनीही विजेत्या ठरल्या.

मारुती आडकर, किसन बुचडे, मारुती सातव, मोहन खोपडे, बंडू येवले, रोहिदास आमले, चंद्रकांत मोहोळ, विजय कुटे, पप्पू कालेकर, निलेश मारणे, खंडू वाळूंज, राकेश सोरटे पंच होते. बाबाजी लिमण यांनी निवेदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)