मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने बीडीओंचा सत्कार

टाकवे बुद्रुक – महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा श्रमिक संघ मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे वतीने मावळ तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांचा सत्कार करण्यात आला.

संघटनेचे सरचिटणीस श्री कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, जिल्हाअध्यक्ष खंडू घोटकुले व मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अध्यक्ष गणेश वाळुंजकर, उपाध्यक्ष जीवन गायकवाड, सचिव राजू कांबळे, सुखदेव गोपाळे, भाऊ कल्हाटकर, वसंत शिंदे, हरीभाऊ चोरगे, राजू वाघोले, अशोक सरोदे, ज्ञानेश्‍वर काळे व मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी गटविकास अधिकारी माळी म्हणाले की, थकीत राहणीमान भत्ता व चालू राहणीमान भत्ता कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी तसेच सेवापुस्तक अद्ययावत करणे त्याचप्रमाणे पंतप्रधान विमा योजना व अटलजी पेन्शन योजना सुरू करून घ्यावेत याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कर्मचारी लागणारी गणवेश, बूट, बॅटरी आदी साहित्य ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील व तसेच या कर्मचाऱ्यांना महानगरपालिका कर्मचारीमध्ये समाविष्ट करण्यात यावे आकृतीबंध वाढ करण्यासाठी पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालायत पाठविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)