मावळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी रमेश पाळेकर यांची निवड

लोणावळा, (वार्ताहर) – मावळ तालुका कबड्डी असोशिएशनच्या अध्यक्षपदी लोणावळ्यातील रमेश पांडूरंग पाळेकर यांची निवड करण्यात आली. मावळातील कबड्डी प्रेमींनी नव्यानेच या संस्थेची नोंदणी केली असून, पाळेकर यांना प्रथम अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. यासह तळेगावचे माजी नगरसेवक गणेश काकडे यांची कार्याध्यक्षपदी व वडगाव मावळ येथील मयुर ढोरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

मावळ तालुका कबड्डी असोशिएशन कार्यकारिणी : रमेश पाळेकर (अध्यक्ष), गणेश काकडे (कार्याध्यक्ष), मयुर ढोरे (उपाध्यक्ष), संदीप पायगुडे (सचिव), विलास जाधव (खजिनदार), विक्रमसिंग देशमुख (सहसचिव), महेश म्हसणे (सह खजिनदार), किशोर दाभणे, रामभाऊ जाधव, विशाल विकारी, अरुण लाड, उमेश तारे, शेखर खिल्लारे, दिपक राक्षे, रजनिकांत यंदे, रामदास पाळेकर, प्रमोद खिल्लारे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

या विषयी बोलताना रमेश पाळेकर म्हणाले की, मावळ तालुक्‍यात कबड्डी खेळणारे युवा खेळाडू आहेत, प्रो कबड्डी लिगमुळे मुलांमध्ये कबड्डीची ओढ निर्माण होत आहे. मात्र संघटना नसल्याने या मुलांना तालुकास्तर, जिल्हा व राज्य पातळी तसेच त्यापुढील स्पर्धामध्ये जाण्याकरिता वाव मिळत नव्हता. मुलांना या खेळात आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव व न्याय मिळावा याकरिता मावळ तालुका कबड्डी असोशिएशनची स्थापना करण्यात आली असून, भविष्यात जास्तीत जास्त स्पर्धाच्या माध्यमातून चांगले कबड्डी खेळाडू घडविण्याचा आमचा मानस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)