मावळ गोळीबार : येळसे येथे गुरुवारी श्रद्धांजली सभा

पवनानगर – पवनानगर येथे मावळ गोळीबारात शहीदांसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवारी (दि. 9) सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात क्रांतीदिनी 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनात गोळीबारामध्ये येळसे येथील कांताबाई ठाकर, शिवणे येथील मोरेश्‍वर साठे, तर सडवली येथील शामराव तुपे या तीन शेतकऱ्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेला उद्या दि. 9 रोजी सात वर्षे पूर्ण होत आहे.

-Ads-

त्यानिमित्त पवनानगर येळसे येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात श्रदांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आंदोलन झालेल्या घटनास्थळावरून ज्योत आणण्यात येणार असून, ती ज्योत येळसे येथील स्मारकापर्यंत आणण्यात येईल. त्यानंतर पवनानगर चौकातून रॅली काढून येळसे येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयामध्ये नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी श्रद्धांजलीसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12.40 मिनिटांनी शहिद झालेल्या शेतकऱ्यांनी श्रद्धांजली वाहण्यात येईल.

या श्रद्धांजली सभेसाठी मावळचे आमदार बाळा भेगडे, सभापती गुलाब म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती एकनाथ टिळे, भारतीय किसान संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव शेलार, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजु खांडभोर, उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, तालुका अध्यक्ष अशोक गायकवाड, संत तुकारामचे कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, माऊली शिंदे, अंकुश सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

तळेगाव, लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आजी-माजी नगरसेवक, विविध गावचे सरपंच, सर्वपक्षीय नेते, शेतकरी बांधव व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)