मावळात “भारत बंद’चा नारा!

  • देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद

मावळ – पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाविरोधात कॉंग्रेससहित अन्य विरोधी पक्षांतर्फे सोमवारी (दि. 10) मावळ तालुक्‍यात बंद पाळण्यात आला. देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा या प्रमुख शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष यांनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारचा निषेध केला.

लोणावळ्यात संमिश्र प्रतिसाद
लोणावळा शहरातील गवळीवाडा नाका परिसरात सोमवारी सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला. या परिसरातील जवळजवळ सर्वच दुकाने तसेच हॉटेल बंद ठेवण्यात आली होती. पण त्याचवेळी लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच अन्य ठिकाणी या बंदचा चांगला परिणाम दिसून आला. या बंदमध्ये सहभागी झालेल्या सर्व विरोधी पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी चौकात निषेध सभा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका करीत निषेध नोंदविला. या वेळी कॉंग्रेसचे जिल्हा समन्वयक नगरसेवक निखिल कवीश्‍वर, नगरसेवक सुधीर शिर्के, संजय घोणे, नगरसेविका पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, आरोही तळेगावकर, राष्ट्रवादीचे बाळासाहेब कडू, मंजुश्री वाघ, दीपक मानकर, मनसेचे भरत चिकणे, रुपेश नांदवटे आदींसह आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तळेगावात बंदला उत्स्फूर्त सहभाग
तळेगाव : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी पुकारलेल्या बंदला तळेगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता मराठा क्रांती चौकामध्ये पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमले तेथून मोर्चास सुरवात झाली. तसेच तळेगाव दाभाडे परिसरातील दुकाने बंद ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. अत्यंत शांततेच्या मार्गाने कार्यकर्ते आवाहन करताना दिसत होते. या वेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश काकडे, माजी मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक बापू भेगडे, किशोर भेगडे, संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालिका अर्चना घारे, तनिष्का पतसंस्थेच्या संचालिका शबनम खान, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या तळेगाव शहराच्या अध्यक्षा सुनिता काळोखे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तळेगाव शहराचे अध्यक्ष आशिष खांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस विद्यार्थी सेना तळेगाव शहराचे अध्यक्ष अक्षय दाभाडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देहुरोडमध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवली दुकाने
देहुरोड : येथील कॉंग्रेसने मुख्य बाजार पेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. इंधनाच्या वाढत्या दराने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. राफेल (विमानाचा) घोटाळा, नोकर भरती, नोटाबंदी, जीएसटी, महिलांवरील वाढते अत्याचार व संविधान बचाव विरोधात भाजप सरकारच्या निषेधार्थ कॉंग्रेसने भारत बंद पुकारला होता. देहुरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तु यांच्या नेतृत्वात परिसरात भारत बंद पुकारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना पुष्पहारार्पण करुन भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी देत बाजार पेठेतून रॅली काढण्यात आली. मेन बाजारपेठेतील ऐतिहासिक नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत शहराध्यक्ष मारीमुत्तू, नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे, दिपक सायसर, देहुरोड शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, भीमशक्‍ती संघटनेचे अध्यक्ष महेश गायकवाड आदींनी मनोगत व्यक्‍त केले. देहूरोड महिला अध्यक्षा ज्योती वैरागर, जिल्हा प्रतिनिधी बाळू पिंजण, व्यंकटेश कोळी, सुखदेव निकाळजे, संभाजी पिंजण, टी. शेकना, अशोक कुसळे, दयाल सिंधवानी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते . याशिवाय कॉंग्रेस आघाडी पक्ष असणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पाठिंबा देत “भारत बंद’मध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादीचे महिलाध्यक्ष शितल हगवणे, माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, रफिक शेख, गणेश कोळी, तरलोचन रत्तू, सुनीता जाधव, महिला एकता संघटनेच्या अध्यक्षा संगीता वाघमारे यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)