मावळात फार्म हाऊसवर गोरख धंदा!

बारबालांवर जीवघेणा हल्ला; एक अटकेत
वडगाव मावळ – पनवेलच्या डान्सबारमध्ये काम करणाऱ्या चार बारबालांना एकाने मावळातील फार्म हाऊसवर बोलावले. तसेच एकीवर पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी देत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आंदर मावळातील फळणे (ता. मावळ) येथील फार्म हाऊसमध्ये शुक्रवारी (दि. 8) करण्यात आला. त्यातील एकाला वडगाव पोलिसांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता अटक केली आहे. सोमवारी (दि. 11) वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
धाडसी ग्रामस्थांच्या पुढाकाराने वडगाव मावळ पोलिसांच्या सतर्कतेने बारबालांचा जीव वाचला. मावळ तालुक्‍यातील फार्म हाऊस गोरख धंद्यांचे अड्‌डे ठरतात.

शरद गोकुळ वीर (वय 38, रा. रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी कैलास कुंजीर (रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांच्यासह अन्य तीन आरोपींचा तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक डी. एस, हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल येथील डान्सबारमधील काम आटोपल्यानंतर चार बारबाला गुरुवारी (दि. 7) रात्री 12 वाजता पुण्यात पबमध्ये आल्या होत्या. रात्रभर पबमध्ये एन्जॉय केल्यानंतर शुक्रवार (दि. 8) सकाळी सकाळी सहा वाजता त्या एका मित्राच्या सदनिकेवर विश्रांतीसाठी थांबल्या होत्या. दुपारी साडेअकराच्या सुमारास त्या पनवेलकडे निघाल्या असताना त्या वेळी त्यांच्यापैकी एकीला तिच्या मित्राने मोबाईलवर संपर्क साधला.

फार्म हाऊसवर येण्याचे निमंत्रण दिले; त्यानुसार चौघीजणी तळेगाव दाभाडे येथे गेल्या. त्यानंतर कारमधून फळणेतील आंद्रा धरणाच्या काठीच्या एका फार्म हाऊसवर त्या पोहचल्या. तेथे रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी शरद गोकुळ वीर (वय 38 रा. रहाटणी, पुणे), कैलास कुंजीर (रा. पिंपळे सौदागर पुणे) यांच्यासह इतर तीन जण दारू पित बसले होते. मुख्य आरोपी कैलास कुंजीर याने पिस्तूल एकीच्या डोक्‍याला लावून जीव मारण्याचा प्रयत्न करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत आहे.

बारबालांनी जीवाच्या आकांताने अंधाराचा फायदा घेवून पळ काढला. टाकवे बुद्रुक येथे वैद्यकीय उपचारासाठी निघालेल्या दोन तरुणांनी त्या बारबालाला पळून जाण्यास मदत केली. आरोपी कैलास कुंजीर याने ग्रामस्थांनाही पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली. वडगाव मावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्या बारबालाची सुटका केली.
पोलिसांनी रविवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजता आरोपी शरद वीर याला अटक केली. अन्य आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तपास करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)