मावळात पर्यटकांची मांदियाळी !

पावसाचा जोर ओसरला : भूशी डॅम, पवना धरणात वर्षाविहारासाठी गर्दी

पुणे, मुंबई शहरातील युवापिढीच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेले लोणावळ्यातील भूशी डॅम, पवना धरण आणि पवनमावळातील आंबेगाव आणि आंध्रा धरण, कान्हे परिसरातील नयनरम्य धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. तीन दिवसांपासून बसरणाऱ्या जोरदार सरी ओसल्यामुळे रविवारी (दि. 16) पर्यटकांनी वर्षाविहाराचा मनमुराद आनंद लुटला. भुशी धरणाकडे वाहनांना “नो-एन्ट्री’ असल्यामुळे पर्यटकांनी मावळ तालुक्‍यातील आंध्रा धरण, पवना धरणाला पसंती दिली. त्यामुळे कोसोदूर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर ओसल्यामुळे पर्यटकांना सुट्टीचा “एन्जॉय’ करता आला. गेल्या काही वर्षांपासून पवना परिसराला पर्यटकांची पसंती मिळते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा, खंडाळा बरोबर पवना धरण परिसराला प्राधान्य देत आहेत.

पवनानगर परिसरात पर्यटकांना पाहण्यासाठी संपूर्ण मावळ तालुक्‍यासह उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण, लोहगड, लोहगड किल्ला, श्री क्षेत्र दुधिवरे (प्रतिपंढरपूर) पुन्हा पवनानगरकडे गेल्यास ठाकुरसाई येथून पवना जलाशयाकडे पाहिल्यास पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय पाहवयास मिळतो. तसेच समोरच असलेला तुंगचा उत्तुंग किल्ला पुढे गेल्यावर तिकोणा किल्ला, अजिवली राई आदी ठिकाणे पर्यटकांना मोहित करतो. या भागातील जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. या भागात बडे बडे अभिनेते, राजकारणी, बिल्डर, क्रिकेटपटू आणि त्यांचे अलिशान बंगले उभारले आहेत. काहींनी जमीनी न मिळाल्यामुळे पवना प्रकल्पाच्या जागेत बांधकाम केले आहे पावसाळ्याच्या दिवसात तर पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी याठिकाणी येत असतात. याशिवाय पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, ठाणे-कल्याण तसेच अनेक शहरी भागातून पर्यटकांनी येथे हजेरी लावली सकाळी दहा पासूनच रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती.

शनिवार तसेच या हंगामातील पहिलाच दमदार पाऊसामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाईने हा परिसरात फुलून गेला होता. पर्यटन झाल्यावर परिसरातील लहान मोठ्या हॉटेलमध्ये मिळणारे स्वादिष्ठ खाद्य पदार्थांवर ताव मारला. आंबेगाव (ता. मावळ) : पावसाचा जोर ओसल्यामुळे धबधब्यावर पर्यटकांनी भिजण्याचा आनंद लुटला.

पर्यटकांची पवना डॅमला पसंती
भुशी डॅमवरील पायऱ्यांवर पाणी कमी झाल्याने पोलिसांनी पर्यटकांसाठी पायऱ्या खुल्या केल्या. रविवारी लोणावळा रस्ता दिवसभर ट्राफिक जाम पर्यटकांच्या ट्राफिकमुळे स्थानिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले. पोलिसांकडून प्रशासनाने वाहतूक समस्येतून मार्ग काढावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
लोणावळा येथील भुशी डॅम शनिवारी व रविवारी ब पर्यटकांसाठी बंद ठेवल्याने पर्यटकांची ओढ पवनमावळाच्या दिशेने वाढू लागली आहे. यामुळे आपसूक पर्याटकांचा मोर्चा पवनमावळकडे वळाला. यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले आहे. शनिवारी व रविवारी पर्यटक येथे गदी होते. आता भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी तीननंतर वाहनांना बंदी घालण्यात आली. त्यामुळे पर्यटकांनी पवना धरणाला पसंती दिली आहे. पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, बेडसे लेणी, श्री क्षेत्र दुधिवरे येथील धबधब्यावर पर्यटक गर्दी करत आहेत.

आंबेगावच्या धबधब्याची पर्यटकांना मोहिनी
आंबेगाव येथील धबधब्यावर भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. त्याबरोबरच पर्यटकांच्या गर्दीने परिसरातील सर्व पर्यटनस्थळे गजबलेली दिसत होती. पण काही पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला वाहने लावल्यामुळे स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर पवनानगर ते लोणावळा रस्ता ट्रॅफिक जाम राहिला यामुळे पवनानगर चौकात देखील दिवसभर ट्रॅफिक जाम राहिले. यामुळे पवनानगर चौकात दिवसभर वाहने धिम्यागतीने वाहतूक सुरू होती.

पवनाधरण व परिसराचे निसर्ग सौंदर्याचा विचार करता व लोणावळ्यात पर्यटकांना आनंद लुटता येत नसल्याने सहाजिकच पवनानगरकडे पर्यटकांची ओढ वाढणार असून, पवनानगर परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण करावे. तसेच पर्यटकांसाठी मोठी पार्किंग व्यवस्था करून राज्य परिवहन महामंडळाने पवनानगर लोणावळा रस्त्यावर बस सुविधा सुरू करावी. यामुळे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेतील आणि वाहतूक समस्येचा प्रश्‍न सुटेल. याशिवाय स्थानिकांना व्यवसाय उपलब्ध होईल.
– ज्ञानेश्‍वर ठाकर,
संस्थापक, ऍड. भरत ठाकर प्रतिष्ठान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)