मावळात ठिय्या आंदोलनाची तयारी

शांततेचे आवाहन : मराठा समाज आरक्षणाची मागणी

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. 9) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत “महाराष्ट्र बंद’च्या धरतीवर सकल मराठा समाज मावळ तालुक्‍याच्या वतीने मावळ बंद चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्या धरर्तीवर मावळ तहसीलच्या महसूल भवनात मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे यांच्या अध्यक्षतेखाली सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या दरम्यान पोलीस बंदोबस्त व नियोजनाबद्दल मावळ तालुक्‍यातील विविध विभागाच्या अधिकारी, कर्मचारी व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसह बैठकीत संपन्न झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रांताधिकारी सुभाष भागडे म्हणाले की, मराठा समाज आरक्षणासाठी मावळ तालुक्‍यात पूर्वी 26 जुलै रोजी शांततेत मावळ बंद आंदोलन झाले. गुरुवारी (दि. 9) मराठा समाज आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदच्या धरतीवर मावळ बंद चक्‍का जाम आंदोलनाच्या वेळी लोणावळा शहर-ग्रामीण व कार्ला आदी परिसरातील आंदोलक लोणावळा रेल्वे स्टेशन येथे रेल्वे-रोको आंदोलन करणार आहेत. आंदर मावळ, नाणे मावळ, कामशेत व कान्हे आदी परिसरातील आंदोलक कान्हे फाटा येथे जुना पुणे-मुंबई महामार्ग रोको आंदोलन करणार आहेत. पवन मावळ, वडगाव, तळेगाव दाभाडे, सोमाटणे, देहूरोड आदी परिसरातील आंदोलक उर्से टोल नाका येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग रोको आंदोलन करणार आहेत.

वराळे, आंबी, वारंगवाडी, नवलाख उंब्रे, माळवाडी, इंदोरी, सुदुंबरे आदी परिसरातील आंदोलक तळेगाव दाभाडे स्टेशन येथे तळेगाव-चाकण राज्यमार्ग रोको करणार आहेत. या चार ठिकाणापेक्षा इतरत्र केलेल्या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व संवाद पाठवू नका. शासकीय व खासगी मालमत्तेचे नुकसान करू नका. आंदोलन काळात जनता-प्रशासन यांचा संवाद कायम राहणार आहे. तसेच आंदोलन शांततेच्या मार्गाने आंदोलन करून अत्यावश्‍यक सेवांना अडथळा आणू नका. शांततेच्या आंदोलनाला जी धार असते ते हिंसक आंदोलनाला नसते. प्रशासन सर्वस्वी आंदोलकांना सहकार्य करणार आहे.

देहुरोड उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे म्हणाले की, आंदोलकांनी आंदोलनाच्या वेळी संशयित व्यक्‍ती व वस्तुंच्या विषयी जागृत राहून अनुचित घटना रोखण्यासाठी नागरिकातील पोलीस व्हा. आंदोलन काळात सर्व शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, कारखाने, बाजारपेठा, रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, खासगी व शासकीय प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ज्या चार ठिकाणी आंदोलकांनी नियोजन केले आहे, त्याच ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे. अन्य ठिकाणी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. आक्षेपार्ह वक्‍तव्य, भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. मावळ बंदच्या धरतीवर मोठ्या प्रमाणात सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शांततेच्या मार्गानेच आंदोलन करण्याचे आवाहन केले. रुग्णालय व औषधालय यांना अडथळा आणू नका.
सकल मराठा समाज मावळ तालुक्‍यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या बैठकीला हजर राहून आंदोलन काळात काय करावे व काय करू नये याच्याविषयी चर्चा व उप प्रश्‍न विचारले.

या वेळी मावळचे तहसीलदार रणजीत देसाई, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मुख्याधिकारी वैभव आवारे, सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता राकेश सोनवणे, भूमी अभिलेख उप अधीक्षक उर्मिला गलांडे, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, विद्युत विभाग उप अभियंता विजय जाधव, एसटी आगर व्यवस्थापक रमेश हांडे, एमआयडीसी अग्निशमन प्रमुख के. डी. कांबळे, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, वनविभाग सोमनाथ ताकवले, वडगाव पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, तळेगाव दाभाडे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, कामशेत पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, तळेगाव एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील आदींसह त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार रणजीत देसाई यांनी केले. पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी आभार मानले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)