मावळात गुटखा विक्री जोमात

  • व्यसनाधिनता वाढली : दाम दुप्पट, तिप्पट दरातून कमाई
  •  अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुटखा विक्री रोखणे ठरतेय आव्हान
  • शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयाच्या आवारातच गुटखा विक्री

तळेगाव दाभाडे (वार्ताहर) महाराष्ट्र गुटखा बंदी असताना, मावळ तालुक्‍यासह ग्रामीण भागातील पानटपऱ्या व दुकानावरही सर्रास गुटखा विक्री जोमात आहे. तीनपट वाढीव किमतींने गुटखा विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे गुटखा विक्री रोखणे ठरतेय आव्हान ठरत आहे. मावळ तालुक्‍यात वारंवार अवैधरीत्या तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली असूनही खुलेआम जोरात गुटखा विक्री केली जात आहे. शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयाच्या आवारातच गुटखा विक्री केली जाते.

अनधिकृत ढाबे, हॉटेल, चायनीज टपऱ्या तसेच मिठाईचे दुकाने थाटली असून, सर्रास अन्न पदार्थ विक्री केली जाते. अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्यास कारवाईचे नाट्य सुरू होते. महाराष्ट्रात जुलै 2012 ला कायद्याचे गुटखा बंदी करण्यात आली. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. या गुटखा बंदी कायद्याला जुलै 2013, जुलै 2014, जुलै 2015, जुलै 2016 व जुलै 2017 पर्यंत कायम करण्यात आले. गुटखा सेवनाने देशात वार्षिक 10 लाख लोकांचा मृत्यू होत असून, 90 टक्के लोकांना तोंडाचा कर्करोग होवून मृत्यू होतो, असा आरोग्य विभागाचा अहवाल आहे.

गुटखा खावून रस्ते, शासकीय कार्यालय, चौक, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, वर्दळीच्या ठिकाणी थुंकून परिसर विद्रूप केला जातो. शासनच्या तंबाखूजन्य व गुटखा पदार्थ विक्री कायद्याला ढाब्यावर बसून मावळ तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, कामशेत, टाकावे बुद्रुक, पवनानगर, लोणावळा आदी शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु आहे.

पोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्राजवळच गुटखा विक्री होत असून, पोलीसच गुटखा घेवून खातात, असे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. पण त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. अन्न व औषध प्रशासन विभाग (औंध -पुणे) येथे असून, मावळ तालुक्‍यासाठी अन्न व ओषध प्रशासन अधिकारी गणपत कोकणे यांची नियुक्ती असून त्यांना कोर्ट, अन्न व औषध प्रशासन परवाना तसेच कारवाई यातच त्यांचा वेळ जातो. त्यामुळे गुटखाकिंगांवर कारवाई करण्यासाठी वेळच भेटत नाही. या गुटख्याचे पेव शहरी भागासह ग्रामीण भागात पसरले आहे. खुलेआम गुटखा विक्री केली जात असून, पानटपऱ्या व दुकानदार गुटख्याची मागणी करताच विमल गुटख्याची 5 रुपये किमंतीची पुडी 15 रुपयाला तर गुटख्याची 7 रुपये किमंतीची पुडी 60 रुपयाला विकली जाते.

परराज्यातील गुटखा ग्रामीण भागात…
परराज्यातून महाराष्ट्रासह मावळ तालुक्‍यात चोरट्या मार्गाने वाहतूक सुरु आहे. या वाहनातून आलेला गुटखा मोठ्या हुशारीने उतरवून घेवून साठवणूक करून रात्रीच पानटपऱ्या व दुकानदारांना विकला जातो. तर ग्रामीण भागात पाव विक्रेत्यांचा सहाय्याने पाठविला जातो.पोलिसांना गुटखा विक्रीबाबत विचारले असता, आमचे काम नाही ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग सांगतो आमच्याकडे अपुरे मनुष्यबळ आहे. मानवाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अपूर्ण मनुष्यबळ असल्याने अनधिकृतपणे ढाबे, हॉटेल, चायनीज टपऱ्या तसेच मिठाईचे दुकाने थाटली असून, सर्रास अन्न पदार्थ विक्री केली जाते. अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्यासच कारवाईचे नाट्य सुरु होते. मावळातील गुटखा विक्री बंद करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय मावळ तालुक्‍यात सुरू करून मनुष्यबळ वाढवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मावळ तालुक्‍यातील गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेवूनच ढाबे, हॉटेल, चायनीज टपऱ्या तसेच मिठाईचे दुकाने सुरू करावेत. परिसरात गुटखा साठवणूक व विक्री होत असल्यास 9422463669 क्रमांकावर संपर्क साधावा.
– गणपत कोकणे,
अन्न व औषध प्रशासन अधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)