मावळातील चार हॉटेल्सवर कारवाई

कामशेत – अवैधरित्या मद्याची विक्री करणाऱ्या मावळातील चार हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (दि. 27) कारवाई केली. 9 हजार 298 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मद्याची विक्री करणाऱ्या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मावळातील पाचाणे गावच्या हद्दीतील मावळी ठेका, कडधे येथील मावळ दरबार, साते येथील हॉटेल मल्हार व आढले येथील हॉटेल मावळ स्पेशल या धाब्यावर अवैधरित्या देशी व विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याची तक्रार होती. त्यानुसार छापे टाकत ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विनापरवाना मद्याची विक्री करणारे सोमेश्वर महादू घोटाकुले, रोहिदास सहादू भोईर, विष्णू साहेबराव ताळे, अक्षय संतोष पिंजन यांना ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक राजाराम खोत व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)