मावळमधून पार्थ पवार 1173 मतांनी आघाडीवर

पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघाची टपाली मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार 1173 मतांनी आघाडीवर आहेत.

पार्थ पवार यांना10341 मते मिळाली आहेत. तर श्रीरंग बारणे यांना 9168 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 719 मते मिळाली आहेत. मतदान यंत्राद्वारे मतमोजणीला काही वेळातच सुरूवात होणार आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी सुरू आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था याठिकाणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)