मावळच्या कुशीत अनधिकृत बंगले

Side View

वृक्षतोडीमुळे ओसाड : नैसर्गिक साधन संपत्तीचा होतोय ऱ्हास
वडगाव मावळ,  (वार्ताहर) – पुणे आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या शहराच्या मध्यावर असलेला मावळ तालुका सर्वाधिक परिचत आहे. तालुक्‍यातून द्रुतगती मार्ग, रेल्वेमार्ग सुकर असल्यामुळे येथे सर्वाचा ओढा वाढला आहे. तसेच, या परिसरात जागा खरेदीसाठी आणि त्या जागेवर बंगले बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, यामुळे मावळातील नैसर्गिक साधन संपत्तीला बाधा येऊ लागला आहे. जागा-खरेदीमध्ये अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकारही नुकतेच घडले असल्याचे निदर्शनास आले आहे.

मावळ तालुक्‍याला निसर्गाची देणगी आहे. ऐतिहासिक किल्ले, धरण परिसर, लेणी, पर्यटन स्थळामुळे परिसरात पर्यटकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या भागात जमिनी घेण्यासाठी मुंबईसह मोठे बांधकाम व्यावसायिक, उद्योजकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच जमिनीला सोन्याचा भाव आल्याने एजंटमार्फत करोडे रुपयांचे व्यवहार होतात. परिणामी, गुंडगिरी वाढली आहे. त्यात फसवणुकीचे प्रकारही घडतात.

पवना धरण परिसरात अनेक उद्योजकांनी, सिनेअभिनते, राजकारणी, बांधकाम व्यावसयिकांनी येथील जागा घेतल्या आहेत. त्या जागेवर अलिशान बंगले बांधून करोडे रुपयांचा खर्च येथे केले असल्याचे दिसून येते. जंगलात बेसुमार वृक्षतोड करुन डोंगर पोखरले आहेत. उत्खनन करुन टुमदार बंगले उभारले असल्याचे दिसून येते. या प्रकरणात सर्व नियमाचे उल्लंघन करून जागा खरेदी केल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना फसवणूक त्यांच्याकडून कमी जागेत जागा लुबाडली आहे. अगदीच महसूल, वन, जलसंपदा, पोलीस यांनाही अर्थपूर्ण संबंधातून चिडीचूप केले जाते. मात्र, यातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीची ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात उत्खनन करुन नैसर्गिक नाले व नैसर्गिक पाण्याचे स्रोत बुजवण्यात आले आहे. प्रवाह वळवून अनधिकृत बांधकामे झाली आहेत. दूषित सांडपाणी नदीपात्रात मिसळले जाते. त्यामुळे भविष्यात पवनेचे पाणी दूषित होण्याची शक्‍यता आहे. बड्या उद्योजकांनी जागेतून रस्ता जात असल्याने पवनेचा रिंग रोड सोयीनुसार वळविला आहे. वेस्टन घाट कमिटीतील पर्यावरण संवेदनशील डोंगर रांगामधील अनधिकृत बांधकामे पर्यावरणाचा विनाश करण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)