मावळच्या उमेदवारीबाबत “सस्पेन्स’ कायम

पिंपरी – महापालिकेत होत असलेल्या चुकीच्या कामांना प्रखर विरोध करा. त्याच्या विरोधात आक्रमकपणे आवाज उठवा. महापालिकेत सर्रासपणे जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात असून, जनतेपर्यंत ही चुकीची कामे पोहचवा अशा सूचना देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेतील नगरसेवक, नगरसेविकांना सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मावळ लोकसभेचा उमेदवार पवार साहेब ठरविणार असल्याचे सांगत उमेदवाराबाबत “सस्पेन्स’ कायम ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष संघटनेचा आणि नगरसेवक, नगरसेविका यांच्या कामकाजाचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती गेस्ट हाऊस येथे आढावा घेतला. या बैठकीला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका बैठकीला उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील पक्ष बांधणी, बुथ कमिटी, नगरसेवकांची कोणती विकास कामे प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकांची कामे होत आहेत का? याचा बैठकीत अजित पवार यांनी आढावा घेतला. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत आहे का?, मेट्रोचे काम, विविध विकास कामांचा आढावा घेतला. महापालिकेत होणाऱ्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवार आक्रमकपणे आवाज उठवा. जादा दराच्या निविदा स्वीकारल्या जात आहेत. त्याला प्रखर विरोध करा. चुकीची कामे जनतेपर्यंत पोहचवा अशा सूचना पवार नगरसेवकांना दिल्या. तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ आली असून वेळ कमी आहे. त्यानुसार कामाला लागा, असेही त्यांनी बजावले.

कामाला सुरूवात करा!
मावळ लोकसभेचा उमेदवार योग्य वेळी जाहीर केला जाईल. शरद पवार साहेब उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असेल याचा विचार करत न बसता कामाला सुरुवात करावी. लोकसभा, विधानभा आणि स्थानिक पातळीच्या निवडणुका वेगळ्या असतात. राष्ट्रवादीची सत्ता असताना केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. आपआपसातील मतभेद बाजूला सारुन प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कामाला सुरुवात करावी, असे आवाहनही त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)