माळेगाव प्राथमिक शाळेला ग्रामपंचायतीकडून साहित्य वाटप

पिरंगुट-माळेगाव (ता. मुळशी) येथील ग्रामपंचायतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच के. बी. चौधरी यांच्या हस्ते येथील प्राथमिक शाळेला लोखंडी कपाट, पाणी शुद्धीकरण यंत्र व प्रिंटर आदी साहित्याचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक संतोष गावडे यांनी साहित्यांचा स्वीकार केला.
यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दिवसभर मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. यावेळी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. बारा नेत्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. डॉ. प्रकाश दवंडे व डॉ. संदीप थिटे यांनी मोफत नेत्र तपासणी केली. हडपसर येथील महंमदवाडीतील एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय व फलटण येथील चिंतामणी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित केले होते. यावेळी उपसरपंच धनंजय मारणे, ग्रामपंचायत सदस्य मल्हार डाळ, रामभाऊ मरगळे तसेच ग्रामस्थ, खोंदाई प्रतिष्ठानचे व श्री भैरवनाथ मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)