माळेगावात दोघांवर प्राणघातक हल्ला

बारामती- गाडीला कट मारुन रागात का बघितले म्हणून सात जणांनी जातीवाचक शिवीगाळ करीत सत्तुराचा वापर करुन दोघाजणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना माळेगाव येथे शुक्रवारी (दि. 2) रात्री साडेदहा वाजता तावरे पेट्रोल येथे घडली. या घटनेतील एक जणांवर बारामती येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या सात जणांवर ऍट्रोसिटीसह गुन्हा दाखल असून सर्व आरोपी फरार आहेत.
रितेश मोरे व अक्षय सुनिल लोंढे (वय 20, रा. माळेगाव) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यानेच फिर्याद दिली आहे. तर ओंकार बंड ,रवी तावरे, अभिजित जगताप, किरण जगताप, अभिजीत चव्हाण, विकास चव्हाण, मोनु ऊर्फ शशिकांत महेश तावरे (सर्व रा. माळेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, अक्षय दुचाकीने निघाला होता. माळेगाव वेशीजवळ ओंकार बंडच्या यांच्यात गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. तर अक्षयने ओंकारला समजवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला पण ओंकारने तावरे पेट्रोल पंपावर ये आपण वाद मिटवु असे सांगितले. यानंतर अक्षय त्याचा मित्र रितेश मोरे, सौरभ भोसले हे तिघे तावरे पेट्रोल पंपावर आले असता तिथे कोणीच दिसले नाही, त्यामुळे तो घरी निघाला असता अचानक राजहंस डेअरीतून वरील सातही आरोपी बाहेर यातील रवीने अक्षयच्या डोक्‍यावर सत्तुरने वार केला, तर किरणने हातातील प्लॅस्टिक पाइप, अभिजीतने चाकुने तर विकास व मोनू यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तर अभिजीत जगताप याने बंदुक दाखविताच सौरव भोसले पळून गेला.तर सत्तुरने वार केल्याने अक्षय खाली कोसळला. यावेळी रितेश मोरे याने मध्यस्थी केली असता त्याच्यावर देखील हल्ला करुन सर्वजण अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. जखमी अक्षय व रितेश यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र अक्षयला डोक्‍यात जबरी मार लागल्याने त्यास खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)