माळेगावातील शौचालयाची दुरवस्था

शौचालयाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी वैयक्‍तीक स्वच्छता ठेवली पाहिजे. तसेच नागरिकांनी चेंबरमध्ये दगडी टाकणे तसेच पाइपलाइन बंद करणे बंद केले पाहिजे. तसेच येथे साफसफाईसाठी कर्मचारी दररोज असतात.
– कैलास कारंडे, ग्रामविकास अधिकारी माळेगाव बुद्रुक

परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

माळेगाव – माळेगाव कारखान्याकडे जाणाऱ्या झैलसिंग रस्तत्यावरती चित्रपट गृहासमोर असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढावली आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. दरम्यान, शौचालयाच्या दुरवस्थेमुळे महिलांची मोठी कुंचबणा होत आहे.
माळेगाव येथे प्रशासनाने लाखो रुपये खर्ची घालत उभारण्यात आलेल्या या शौचालयाची दुरवस्था झाली असून आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या शौचालयाची देखभाल दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याने या शौचालयाच्या अवती भवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून दुर्गंधी पसरली आहे. दरवाजे तुटले आहेत. या शौचालयाचा वापर मद्यपी,गर्दुल्यांकडून होत असल्याने सुविधेअभावी अनेकदा शौचालयाबाहेर घाण केली जाते. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच एक तर हे शौचालय तोडून टाकावे अन्यथा दुरुस्त करून निगा राखावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

शौचालयाचा वापर करणाऱ्या नागरिकांनी वैयक्‍तीक स्वच्छता ठेवली पाहिजे. तसेच नागरिकांनी चेंबरमध्ये दगडी टाकणे तसेच पाइपलाइन बंद करणे बंद केले पाहिजे. तसेच येथे साफसफाईसाठी कर्मचारी दररोज असतात.
– कैलास कारंडे, ग्रामविकास अधिकारी माळेगाव बुद्रुक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)