माळी समाज संघाचा सन्मान सोहळा

उरुळी कांचन – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल उरुळी कांचन माळी समाज संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. समाजरत्न-सुदाम सखाराम रायकर, क्रांतिसुर्य महात्मा फुले कार्यगौरव-ज्ञानोबा तुळशीराम कांचन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कार्यगौरवाने माजी आमदार कमल उल्हासराव ढोले पाटील यांना गौरविण्यात आले.
यावेळी माजी महापौर उल्हासराव ढोले पाटील, महात्मा गांधी सर्योदय संघाचे विश्वस्त महादेव कांचन, हेमलता बडेकर, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बडेकर, नगरसेविका जयश्री बोडके, राजेंद्र जगताप, संतोष कांचन, रोहन ननावरे, समता जगताप, संजय टिळेकर, राजेंद्र टिळेकर, सरेश सातव, लक्ष्मणतात्या जगताप, शंकरराव म्हेत्रे, गोरक्षनाथ ताम्हाणे, गंगाराम शिवरकर, मधुकर फुलवरे, शशिभुषण होले, यांच्यासह समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संजय रायकर व सूत्र संचालन किसनराव नेवसे यांनी केले. भाजप व्यापारी आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष विकासदादा जगताप यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)