माळीवाडा, तारकपूर, स्वस्तिक बसस्थानकांचा कायापालट

नगर – अहमदनगर विभागातील सर्व बसस्थानकांत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. एकात्मिक सुविधा व्यवस्थापनानुसार परिवहनमंत्री तथा रापमंचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या सूचनेनुसार बसस्थानकांची स्वच्छता करण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत मागील दोन दिवसांत शहरातील माळीवाडा, तारकपूर, स्वस्तिक या बसस्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून बसस्थानकांमध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांची स्वच्छता, जाळी-जळमटे झटकून आंतरबाह्य करताना दैनंदिन स्वच्छताही राखण्यात येईल. प्रवाशांनी या मोहिमेत सक्रिय सहयोग द्यावा. स्वच्छ व सुंदर बसस्थानकांसाठी प्रवाशांचा सहयोग आवश्‍यक आहे.
नितीन मैंद
विभागीय नियंत्रक

राज्यभरातील बसस्थानकांंचा कायापालट करण्यासाठी रापमंच्या वतीने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत मोहीम हाती घेण्यात आली आहे. ब्रिक्‍स इंडिया या कंपनी व्यवस्थापनाच्या मार्फत जिल्ह्यातील बसस्थानक स्वच्छता अभियानाचे काम विभाग नियंत्रक नितीन मैंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील व आगारप्रमुख अविनाश कलापुरे यांच्या देखरेखीखाली 23 मार्च रोजी ही मोहीम सुरू करण्यात आली. बसस्थानकांमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे.

प्रवासानिमित्त बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना या मोहिमेमुळे प्रसन्नता लाभेल हे निश्‍चित. पहिल्या टप्प्यात बसस्थानकांची संपूर्ण स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर ब्रिक्‍स इंडिया कंपनीमार्फत बसस्थानकांची दैनंदिन स्वच्छता काटेकोरपणे राखण्यात येणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)