माळीनगर फेस्टिवलची दिमाखात सुरुवात

अकलूज- माळीनगरमधील विविध संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या नावीन्यपूर्ण “माळीनगर फेस्टिव्हल’ आणि शाळेच्या “वार्षिक स्नेहसंमेलन’चे उद्‌घाटन माळीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांचे हस्ते करण्यात आले.
येथील “दि सासवड माळी शुगर फॅक्‍टरी, दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर ग्रामपंचायत, माळीनगर विकास मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने 2 ते 6 डिसेंबर या कालावधीत मॉडेल विविधांगी फेस्टिवल प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या 16 व्या माळीनगर फेस्टिव्हल आणि वार्षिक स्नेहसंमेलन आणि कला-क्रीडा उत्सवाचे उद्‌घाटन महात्मा फुले-आंबेडकर नगर’ या फलकाचे अनावरणाने आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी माळीनगर साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्‍टर राजेंद्र गिरमे, संचालक मोहन लांडे, सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त सुरेश बोरावके, उपाध्यक्ष ऍड. सचिन बधे, सेक्रेटरी अनिल रासकर, संचालिका निशा पांढरे, संचालक अजय गिरमे, म. फुले पतसंस्थेचे व्हाईसचेअरमन महादेव एकतपुरे, संचालक जयवंत चौरे, शुगरकेन सोसायटीचे संचालक सुबोध गिरमे, प्रिन्सिपल वसंत आंबोडकर, उपप्राचार्य प्रकाश चौरे, पर्यवेक्षक स्वाती घोडके, के. बी. बिराजदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामहरी वायचळ यांनी केले, तर प्राचार्य गिरीश ढोक यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)