माळशेज घाटात दरड कोसळली

वाहतुकीसाठी पूर्णपणे दोन दिवस बंद

एसटीतील प्रवासी बालंबाल बचावले : टेम्पोचालक गंभीर जखमी

ओतूर – माळशेज घाटात मंगळवारी दि. २१ रोजी दरड कोसळल्याने झालेल्या अपघातात एक टेम्पोचालक गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी पहाटेच्या अडीच्या सुमारास ही दरड कोसळली आणि त्या दरडीखाली आयशर टेम्पो अडकला. त्या टेम्पोचा चालक असलेल्या अमोल दहिफळे (रा. मोहटादेवी, जि. नगर) हा गंभीर जखमी झाला. मदतीसाठी ओतुर १०८ अॅम्ब्युलन्स तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. डॉ सचिन खेडकर व पायलेट गणेश गायकर यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी आळेफाटा येथे हलविले.

ही दरड कोसळत होती तेव्हा तिथून एक एसटी पास होत होती. एसटी पुढे गेली आणि दरड कोसळली. त्यामुळे एसटीतील प्रवासी बालंबाल बचावले.
त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली आहे. महामार्ग अधिकारी, कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. घाटात खूप धुके असून त्याचा अंदाज घेऊन दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे, परंतु दाट धुके व मुसळदार पावसामुळे कोसळलेली दरड हटविण्यास विलंब होत आहे.अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे
नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्प झालेली आहे. पावसाळा आला की माळशेजघाटातील धबधब्यांच्या मनसोक्त आनंद लुटण्यासाठी शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र हा घाट म्हणजे मृत्यूची वाट बनला असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. घाटातील दरडी कोसळुन कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवलेल्या आहेत. यासाठी खूप खर्च करण्यात आला आहे.
कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गवर दररोज धावणाऱ्या लांब पल्याच्या २०८ फेऱ्या व इतर ३५ फेऱ्या पूर्णपणे बंद असल्याची माहिती ओतूर बसस्थानकाचे व्यवस्थापक व्ही.एस. परदेशी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)