माळशिरस तालुक्‍यातील 54 गावांत विकासकामे मार्गी

अकलुज- माढा लोकसभा मतदार संघाच्या माळशिरस तालुक्‍यातील 54 गावांना खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार निधीतुन विविध विकास कामे करण्यात आली आहेत. खुली व्यायामशाळा, प्रवासी निवारा शेड व हायमास्ट पोलच्या निधीचे नुकतेच वाटप वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबराजे देशमुख, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील, सुनंदा फुले, आमदार हनुमंत डोळस, उपसभापती किशोर सुळे, मामासाहेब पांढरे, सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, देवश्रीदेवी मोहिते पाटील समवेत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की, माळशिरस तालुक्‍यातील वीज, पाणी, रस्ते व रेल्वे आदी प्रश्न राज्यात व देशात सत्ता नसतानाही खासदार विजयसिंह पाटील यांनी मार्गी लावले. हायमास्ट पोलमुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण घटले आहे. प्रवासी निवारा शेडमुळे प्रवाशांची बसण्याची सोय झाली आहे. तसेच खुल्या व्यायामशाळेमुळे मुलांमुलींची व्यायामाची सोय झाली आहे. महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिलीव, महाळुंग आदी मोठ्या शहरात ही सुरू करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कृष्णा भीमा स्थिरीकरण ही काळाची गरज आहे. तेलंगणात गोदावरी खोऱ्यात राबविण्यात आलेल्या प्रकल्पामुळे आज ते राज्य शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी समृध्द झाले आहे. त्याच धर्तीवर कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प झाल्यास पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. हा प्रकल्प होणे गरजेचे आहे.
खुली व्यायामशाळा मंजूर झालेली गावे
नातेपुते, सदाशिवनगर, जाधववाडी, कन्हेर, माळशिरस, आनंदनगर, यशवंतनगर, गिरझणी, पिलीव, अकलुज, वेळापुर, झंजेवाडी (खु), खुडुस, निमगाव (म), नेवरे, खळवे, खंडाळी, पिसेवाडी, तांबेवाडी, वाघोली, महाळुंग, वाफेगाव, मीरे, उंबरे (वे), कोंढारपट्टा, नेवरे व जांभुड. प्रवासी निवारा शेड मंजूर झालेली गावे : मांडवे, उघडेवाडी, जाधववाडी, निमगाव (म), बोरगाव व विजयवाडी. हायमास्ट पोल मंजूर झालेली गावे : माळशिरस, अकलुज, वेळापूर, नेवरे, खळवे, मोटेवाडी (मा), डोंबाळवाडी (खु), पानीव, सुळेवाडी, खुडुस, खंडाळी, झिंजेवस्ती (पिलीव), मीरे व नेवरे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)