माळशिरसमध्ये हरिनाम सप्ताहाची सांगता

माळशिरस- रामनवमीनिमित्त 19 मार्चपासून माळशिरस येथे आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता नुकतीच माळशिरस येथे मोठ्या उत्साहात झाली. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, तुळशीचे रोपटे, डोक्‍यावर घेवून वारकऱ्यांनी गावाला नगरप्रदक्षिणा करून गावाच्या मुख्य चौकात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी महिला व पुरुष वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात व मृदुंगाच्या तालावर फुगडी खेळून आनंद साजरा केला. यानंतर हभप सदानंद गुरुजी यांचे शिष्य निम्बूत येथील हभप दत्तात्रय महाराज फरांदे यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर अखंड हरिनाम सप्ताह माळशिरसचे व्यासपीठचालक हभप सुभाष महाराज यादव यांचे हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताह कमेटी व यात्रा कमेटी माळशिरस यांचे वतीने उपस्थित वारकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, भुलेश्वर प्रासादिक दिंडीचे चालक हभप लक्ष्मण महाराज यादव, माजी सरपंच बाळासाहेब पाटील, एकनाथ यादव, उपसरपंच निलेश गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील यादव व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर उपस्थित वारकरी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाचे आयोजन अरुण यादव व भानुदास माने मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)