माळशिरसमधील जलसंधारण कामाची चौकशी सुरु

संग्रहित छायाचित्र
  • राज्याचे कृषी आयुक्‍त यांचे आदेश : तक्रारदार श्रीनिवास कदम पाटील यांची माहिती, दैनिक “प्रभात’ वृत्ताचा परिणाम

अकलूज – माळशिरस तालुका कृषी कार्यालयाने सन 2013-14 ते सन 2016-17 या कालावधीत जलसंधारणच्या केलेल्या कामामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना निवेदनाव्दारे केली होती. तसेच याची वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ दादासाहेब सप्रे अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालय पुणे, यांची नेमणूक केलेली होती. त्यांच्या आदेशाप्रमाणे शुक्रवारी (दि. 11) माळशिरस तालुक्‍यातील जलसंधारण कामाला चौकशीसाठी प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार पोलीस मैत्री संघाचे संस्थापक-अध्यक्ष श्रीनिवास कदम पाटील यांनी दिली.

याबाबतचे वृत्त दैनिक “प्रभात’मध्ये दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रकाशित झाले होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करोडो रुपयांचे घोटाळे बाहेर येण्याची शक्‍यता आहे. माळशिरस तालुक्‍यात जलसंधारण कामाच्या भ्रष्टाचाराची आणि अनियमिततेची चौकशी करण्यासाठी आलेले दादासाहेब सप्रे यांनी प्रथम आवश्‍यक असणारी कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी कोणते गट व कोणते काम तपासवायचे हे सांगिलते. त्यानंतर “मी त्यांना कृषी विभाग जी कामे सुचविल ती कामे चौकशीसाठी घ्यावी’ असे सूचविले. त्यानंतर कृषी विभागाने गारवाड येथील सन 2014 सालातील डिपीडिसीमधून झालेला गट नं. 1 अ, ब मधील नाला बांध तपासणीसाठी घेण्यात आला. मोजमाप आणि टेपने अंतर मोजल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांना सूचविल्याचे सांगितले.

यावेळी कदम पाटील यांनी सांगितले की, माझ्या अर्जातील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी व्हावी, माझा चौकशीमधील मूळ मुद्दा सिमेंट नाला बांध आणि माती नालाबांध यामध्ये पाया काढलेला नाही. माती नालाबांधच्या पायामध्ये काळीमाती भरलेली नाही. त्यामुळे हे मुद्दे काम पूर्ण झाल्यामुळे वरून दिसणार नाही, असे मी त्यांना सूचविले. यावर काम केलेल्या मजुरांचा जबाब नोंदवावे. कोणत्या मजुराने कोणते काम केले आणि किती दिवसांत केले? त्यापासून त्याला किती रोजगार मिळाला? तसेच कंपार्टमेंट बंडींग कामामध्ये गफला झालेला आहे. या क्षेत्रामध्ये धरलेले घन मीटरने काम न करता बोगस बिले काढली आहेत. तेही सर्व कामांचे मोजमाप घेतले जाईल, असे चौकशी अधिकारी यांनी सांगितले.

 

 माळशिरस तालुक्‍यातील जलसंधारण कामातील चौकशी अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्या विरोधात नसून ज्या कामामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झालेला आहे. आणि तो निपटून काढणे हा देशाचा नागरिक म्हणून माझे कर्तव्य समजून मी याबाबत तक्रार केली आहे. – श्रीनिवास कदम-पाटील, तक्रारदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)