माळशिरसचा सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार

गटर योजनेसाठी 25 लाख मंजूर

नायगाव – लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांसाठी अनुदान अंतर्गत माळशिरस येथील अंतर्गत गटर योजनेसाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुरंदर-हवेलीतील कामांना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सूचनेनुसार 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
माळशिरसमध्ये सांडपाण्याची समस्या गंभीर होती. सांडपाणी रस्त्यावर सोडले जात असल्यामुळे गावात अस्वछता दिसून येत होती. सांडपाणी रस्त्यावर सोडल्याने गावच्या अंतर्गत रस्त्यावर वाहतूकीचाही प्रश्न निर्माण होत होता. त्यामुळे माळशिरस ग्रामपंचायतीचे सदस्य राजेंद्र गद्रे यांनी पुरंदर युवासेना समन्वयक गणेश मुळीक यांच्या सहकार्याने या प्रश्नावर उपाय म्हणून अंतर्गत गटाराची मागणी केली होती. या मागणीनुसार राज्यमंत्री शिवतारे यांनी माळशिरस गटर योजनेचा समावेश करण्याची सूचना केली.
त्यानुसार माळशिरस अंतर्गत गटर योजनेसाठी 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या कामासाठी मुद्रांक शुल्क अनुदानातून 10 लाख रुपयांचे काम चालू आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत माळशिरस येथील बौध्दवस्ती येथे बंदिस्त गटार योजनेसाठी 9 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • सांडपाणी व्यवस्थापणाचे काम मार्गी लागल्यामुळे आरोग्य, स्वछता व वाहतूक हे नागरिकांना भेडसावणारे प्रश्‍न सुटणार आहेत. तसेच गावामध्ये हा प्रश्न वर्षांनुवर्षे प्रलंबित होता. त्यामुळे ही समस्या राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यापुढे मांडली व त्यांनी या प्रश्नाला प्राथमिकता देऊन त्यासाठी तात्काळ सूचना केल्या. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामासाठी पुरंदर तालुका युवा सेना समन्वयक गणेश मुळीक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
    राजेंद्र भुलाजी गद्रे :
    सदस्य, ग्रामपंचायत माळशिरस

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)