माळवाडी येथे दुर्मिळ मांडुळ जातीच्या सापाला जीवनदान

इंदोरी – माळवाडी (ता. मावळ) येथील सुभाष दाभाडे यांच्या शेतामध्ये शेतीची कामे सुरू असताना दुर्मिळ मांडुळ जातीचा सर्प आढळला. स्थानिक त्याला मारण्यास पुढे सरसवले; परंतु सुभाष दाभाडे यांनी मांडुळ जातीचे सर्प दुर्मिळ आहेत. त्यामुळे त्याला मारून दिले नाही. दाभाडे यांनी त्वरित तळेगाव दाभाडे येथील सर्प मित्रांना बोलावले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सर्पमित्र भास्कर माळी, नयन कदम, मयुर दाभाडे घटनास्थळी हजर झाले असता सुमारे 3 फूट लांबीचा दूर्मिळ मांडूळ सर्प आढळला; सर्पमित्रंनी वनखात्याला माहिती देऊन मांडूळ सर्पला सुखरुप जंगलात सोडून दिले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमुळे दुर्मिळ मांडूळला जीवनदान मिळाले. आतापर्यंत या संस्थेमार्फ़त अनेक वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.

दूर्मिळ मांडूळ सर्प हा बिनविषारी सर्प आहे. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी. तोंड व शेपटी आखूड. डोळे लहान, बाहुली उभी जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर हा भक्ष्य गिळतो,अशी माहिती सर्प मित्र नयन कदम यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)