माळवाडीत सद्‌गुरू चरण पादुका महोत्सव

मंचर – माळवाडी (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 22) सद्‌गुरू चरण पादुका पुजन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची अशी माहिती निमंत्रक युवराज कानडे आणि कार्यक्रमाचे आयोजक मारुती म्हसे पाटील यांनी दिली. मंचर येथील पंचरत्न बिल्डिंगशेजारी असणाऱ्या ड्रीम सिटी इमारत माळवाडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गिरनार पर्वताच्या 191 पेक्षा जास्त पौर्णिमा वारी करणारे प्रमोद केणे यांकडून दत्त साक्षात्काराचे स्वानुभव ऐकण्याची अध्यात्म पर्वणी यावेळी श्रोत्यांना लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी दत्त याग, यज्ञ, स्वामी चरण पादुका, श्री साईनाथ चरण पादुका, गजानन महाराज चरण पादुका यांचे दर्शन लागणार आहे. सायंकाळी पाच ते सात सुप्रसिद्ध गायक संजय गीते यांचा भजन-संध्या कार्यक्रम होणार आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांच्या हस्ते साडेसात ते नऊ वाजता महाआरती होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धर्मवीर पतसंस्थेचे संचालक प्रणव ऊर्फ पप्पुशेठ थोरात यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)