माळकूपमध्ये विहिरीत क्रेन बकेट कोसळून एक ठार

भाळवणी – पारनेर तालुक्‍यातील माळकूप येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेनची बकेट कोसळून एक कामगार ठार, तर एक जखमी झाला. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. माळकूप येथे शेतकरी हरिभाऊ नाबगे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. दुपारी दोनच्या सुमारास विहिरीत उतरलेले 4 कामगार जेवण करण्यासाठी क्रेनच्या बकेटने वर येत होते. ब्रेक फेल झाल्याने बकेट कामगारांसह विहिरीमध्ये कोसळली. त्यातील चार कामगारांपैकी दोन कामगार जखमी झाले. बबन शेलार (वय 53) यांचा उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. बापूसाहेब महांडुळे या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)