मालेगाव बॉम्बस्फोट: साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित सह अन्य आरोपींवर आरोप निश्चित

मुंबई – मालेगाव 2008 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील संशयीत आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले.

आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत एनआयए कोर्टात सुरू असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याला स्थगिती देणार नसल्याचे कोर्टाने म्हटले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमधील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी काही वर्षांपूर्वी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा व इतर सहा जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर सर्व सातही आरोपींनी आपल्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)