बामाको – मालीच्या उत्तरपुर्वेकडील भागात झालेल्या एका जिहादी हल्ल्यात किमान 20 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. नायगरच्या सीमेला लागून असलेल्या भागात इस्लामिक कट्टरपंथीयांनी हा हल्ला केला. या भागातील िंहंसक घटनांमध्ये अलिकडेच शंभरावर लोक ठार झाले आहेत त्याच पार्श्‍वभूमीवर आज पुन्हा हा मोठा हल्ला झाला असल्याने येथील जनजीवन पुर्ण विस्कळीत झाले आहे.

आजच्या घटनेच्या संबंधात माहिती देताना सूत्रांनी सांगितले की तीन वाहने आणि एका दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा हल्ला केला. त्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ही जीवीत हानी झाली. या भागात अलकायदाचे गनिम मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असावा असा कयास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)