मालिकेत आघाडी मिळवण्यास दोन्ही संघ उत्सुक

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय क्रिकेट मालिका 
मुंबई – पहिल्या सामन्यात भारतीय संघने मिळवलेल्या धदाकेबाज विजयानंतर वेस्ट इम्डीजने आगामी दोन्ही सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करताना दुसरा सामना अनिर्णीत राखला तर तिसऱ्या सामन्यात तब्बल 43 धावांनी विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले असून आजच्या सामन्यात भारतीय संघ विजयीरथावर परतण्यास उत्सूक असणार असून विंडीजचा संघ सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारत आणि विंडीजदरम्यान झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवताना भारताने मालिका जिंकली. भारतीय संघ आपली तीच विजयी लय एकदिवसीय मालिकेत कायम ठेवेल अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, पहिल्याच सामन्यात विंडीजने जोरदार फलंदाजी करताना भारता समोर विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात रोहित आणि विराटच्या फलंदाजीने भारतीय संघाने सामना आपल्यानावे केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताने विंडीजला दिलेल्या 322 धावांच्या आव्हानाचा पाठलाग विंडीजने यशस्वीरित्या केला, मात्र त्यांना विजयासाठी 1 धाव कमी पडली आणि भारताला हा सामना बरोबरीत रोखण्यात यश मिलाले. मात्र, तिसऱ्या सामन्यात विंडीजने केलेल्या 283 धावांचा पाठलाग विराटच्या शतकानंतरही भारतीय संघाला करता आला नाही त्यामुळे भारतीय संघाला 43 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे भारतीय संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजय रथावर परतण्यास उत्सूक असनार आहे. तर, विंडीजचा संघ मालिकेत मिलालेला फॉर्म कायम राखत आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. त्यातच भारतीय संघामध्ये तिसऱ्या सामन्यात तब्बल तीन बदल केले गेले होते. हे बदल भारतीय संघाला लाभले नसल्याचे तिसऱ्या सामन्याच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघातून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, उमेश यादव आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाला वगळण्यात आले होते. त्यांच्या जागी संघात भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि खलील अहमद यांचा समावेश करण्यात आला होता.

मात्र, या सामन्यात विराट आणि शास्त्रीयांनी आपल्या मधल्याफळीवर जास्तच विश्‍वास ठेवून एका अष्टपैलू खेळाडू ऐवजी एक अतिरीक्त गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला हा निर्नय चुकिचा होता हे सामन्यानंतर जाणवले. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात अष्टपैलू म्हणुन रविंद्र जडेजा अथवा केदार जाधव यांचा संघात समावेश केला जाऊ शकतो. त्याच बरोबर आता पर्यंत सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मधल्याफळीने मालिकेत पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी नोंदवली असून भारतीय संघाला मधल्याफळीतील फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.

मालिकेत सुरुवातीपासूनच विंडीजच्या शाई होप आणि शेमरॉन हेतमायरयांनी सातत्यपूर्ण कामगिरी करताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवलेली आहे त्यातच कालच्याही सामन्यात होपने दमदार फलंदाजी करताना 95 धावांची बहुमुल्य खेळी केली. तर, हेतमायरने वेगवान खेळी करताना 37 धावा करत संघाची धावगती वाढवण्यात मदत केली. त्यामुळे त्यांना रोखण्याचे आज भारतीय संघासमोर आव्हान असनार आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, मनिष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, युझुवेंद्र चहाल, कुलदीप यादव, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, केदार जाधव.
वेस्ट इंडीज – जेसन होल्डर (कर्णधार), फॅबिएन ऍलन, सुनिल अंबरीस, देवेंद्र बिशू, चंद्रपॉल हेमराज, शिमरॉन हेतमायर, शाई होप, अल्झारी जोसेफ, एविन लुइस, ऍश्‍ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लोन सॅम्युएल्स, ओश्‍ने थॉमस.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)