मालाला उठाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत

उरुळी कांचन- शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालाला सध्या बाजारभाव नाही. फूलबाजारात देखील त्याला उत्पन्न मिळत नाह त्यामुळे सध्या तो खूपच आर्थिक संकटात सापडला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी नुकतेच केले.
कोरेगावमूळ (ता. हवेली) येथील बोधे काकडे वस्तीवरील श्री दत्त, गणेश आणि स्वामी समर्थ मंदिराच्या उद्‌घाटनप्रसंगी देवकाते बोलत होते. शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येऊ दे, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी मंदिरात केली. कोरेगावमूळ (ता. हवेली) बोधे-काकडे वस्ती येथील श्री दत्त मूर्ती, स्वामी समर्थ मूर्ती आणि गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण आळंदी देवाची येथील सदगुरू हभप शंखनाथजी महाराज यांच्या हस्ते झाला.
या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणानिमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दारात रांगोळ्या घालून आणि गुढ्या उभारून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. मंदिरात अभिषेक, होम, आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी झाले. तसेच आळंदी देवाची येथील सदगुरू हभप शंखनाथजी महाराज यांचे प्रवचनही झाले. दरम्यान या कार्यक्रमाच्यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सरपंच नंदकुमार काळभोर, माजी सरपंच नवनाथ काकडे, हवेली युवक कार्याध्यक्ष गणेश महाडिक, तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित कांचन, हवेली भाजप अध्यक्ष गणेश कुटे, उपसरपंच रवींद्र कंद, माजी संचालक बापुसाहेब बोधे, सुभाष काळभोर, दिलीप वाल्हेकर, सरपंच रोहिणी कानकाटे, माजी सरपंच प्रमोद बोधे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मुकिंदा काकडे, शिक्षक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्र बोधे, संतोष चौधरी सचिन मोरे विजय तुपे सोरतापवाडी गावचे सरपंच सुदर्शन चौधरी, संतोष बोधे, आदर्श सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश काकडे, माजी सरपंच बाळासाहेब बोधे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र भंडारे, अशोक कारंडे, सुरेश वाळेकर, अशोक म्हस्के, कविता काकडे, नारायण शिंदे, अमोल भोसले, संपत डिंबळे, धनाजी ढावारे, आप्पासाहेब शिंदे, आप्पासाहेब कानकाटे, सुदर्शन चौधरी, बाबासाहेब चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)