मालाडमध्ये भीषण आग…

मुंबई – मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मालाड पश्‍चिममधल्या सोमवार बाजार परिसरात सकाळी 11 वाजता केमिकल पावडर आणि लोखंडी डाय बनवण्याच्या कंपनीला आग लागली. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आणखीच पसरल्याने कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोन करुन याची माहिती दिली.

त्यानंतर अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे टॅंकर्स घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्‍यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा रहिवासी आणि व्यासायिक परिसर आहे. इथे लाकडी वस्तूंची अनेक दुकाने आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु आगीनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. परिणामी वाहनांचे मार्ग वळवण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)