मालवाहतुकीसाठी टनांची मर्यादा वाढविली

पाठपुराव्याचे यश : केंद्राचे परिपत्रक आता राज्यानेही स्वीकारले

प्रभात पॉझिटिव्ह
पुणे, दि. 4 – ट्रकमधून मालवाहतुकीसाठी आवश्‍यक टनांची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांना त्याचा फायदा होणार असून जादा माल वाहून नेणे सुलभ होणार आहे त्याचबरोबर डिझेलचीही बचत होणार आहे.
गेल्या महिन्यात माल वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी सहा दिवस देशव्यापी संप पुकारला. यावेळी मालवाहतूकदारांच्या विविध मागण्या मान्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामध्ये ट्रक मधून मालवाहतूक करण्यासाठी आवश्‍यक असणारी टनांची मर्यादा वाढविण्यात यावी, अशीही मागणी होती. याची तातडीने दखल घेत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने मालवाहतुकीत टनांची मर्यादा वाढविल्याचे परिपत्रक काढले. दरम्यान, याबाबत राज्य शासनाने आतापर्यंत आदेश काढला नव्हता. मालवाहतूकदारांनी कळविल्यानंतर आता राज्य शासनाने केंद्राच्या नवीन परिपत्रकाचा स्वीकार केला आहे. ही मर्यादा वाढविल्याने त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे. शिवाय आर्थिक बचत आणि पोलिसांकडून होणारी अडवणूक थांबणार आहे.

-Ads-

असे असतील बदल
– टू-टायर ट्रकसाठी 16 टनांची मर्यादा वाढवून आता 18.5 टन
– थ्री-टायर ट्रकसाठी 25 टनांची मर्यादा वाढवून 28 टन
– छोट्या कंटनेरची 44 टनांची मर्यादा 49 टन.
– मोठ्या कंटेनरची 49 टनांची मर्यादा आता 55 टन.

शहरांतर्गत ज्या टुरिस्ट टॅक्‍सी धावतात, त्या चालकांना यापुढे बॅचची गरज लागणार नाही. या टॅक्‍सी चालकांना पूर्वी परवाना नूतनीकरण करताना आरटीओकडून बॅच घेणे बंधनकारक होते. गेल्या आठवड्यात राज्य शासनाबरोबर वाहतूक व टॅक्‍सी चालक संघटनांच्या झालेल्या बैठकीत बॅचची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचा “जीआर’ लवकरच काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
————

गेल्या महिन्यात आम्ही जो संप केला, त्यावळी ही मागणी केली होती. केंद्र शासनाने तातडीने त्याला मान्यता देऊन परिपत्रकही काढले, पण राज्य शासनाने दखल घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही जाणीव करुन दिल्यानंतर त्यांनी या परिपत्रकाला मान्यता दिली आहे. त्याचा फायदा मालवाहतूकदारांना होणार आहे.
– बाबा शिंदे, सदस्य, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)