नवी दिल्ली : पर्यटनस्थळाबरोबरच मालवाहतुकीचे केंद्र म्हणून गोवा विकसित करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य आणि खासगी भागीदारांबरोबर काम करत आहे, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.

दाबोलिम विमानतळाच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 300 कोटी रुपये खर्च करुन दाबोलिम विमानतळाचे नुतनीकरणाचे काम सुरु असून जुलैपर्यंत नवे बहुस्तरीय पार्किंग संकुल कार्यान्वित होईल, असे प्रभू यांनी सांगितले. मोपा विमानतळ सप्टेंबर 2020 पर्यंत कार्यान्वित होणार आहे.

कौशल्य विकास आणि स्टार्ट अप इंडिया कार्यक्रमांतर्गत गोवा बाजारपेठ केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय जागतिक बँक आणि इतर मोठ्या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत असल्याचेही, प्रभू यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)