मालमत्तेवरील संयुक्त मालकी

जर एखाद्या संपत्तीवर एकापेक्षा अधिक व्यक्तींची संयुक्त मालकी असेल तर त्याला “जॉइंट ओनरशिप’ असे संबोधले जाते. वडिलार्जित संपत्तीवर मुले आणि मुलींची सामायिक मालकी असते. कोणत्याही मालमत्तेचा एखादा सामायिक मालक एखाद्या अनोळखी किंवा दुसऱ्या सामायिक मालकाकडे आपल्या हिश्‍शाची मालकी हस्तांतरित करू शकतो. हे हस्तांतरण ज्या व्यक्तीच्या नावे होते, त्या व्यक्तीला सहमालक म्हणून मान्यता मिळते. जर एखाद्या मालमत्तेत एखाद्याचा हिस्सा असेल, तर तो त्या मालमत्तेचा सहमालक किंवा सामायिक मालक आहे, असा त्याचा अर्थ होतो. सामायिक मालकाला या मालमत्तेवर कब्जा करण्याचा अधिकार, त्याचा वापर करण्याचा अधिकार किंवा आपल्या हिश्‍शाच्या मालमत्तेची विक्री करण्याचा अधिकार असतो.

टेनेन्ट्‌स इन कॉमन : टेनेन्ट्‌स इन कॉमन हा सामायिक मालकीचा एक प्रकार आहे. परंतु अशा प्रकारच्या सहमालकीच्या बाबतीत कायदेशीर दस्तावेजात स्पष्टपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संपूर्ण मालमत्तेत या टेनेन्ट इन कॉमनचा वेगवेगळ्या हेतूने हितसंबंध असतो. वेगवेगळे हितसंबंध असूनसुद्धा प्रत्येक टेनेन्ट इन कॉमनला हा अधिकार आहे, की तो पूर्ण मालमत्तेचा कब्जा स्वतःकडे ठेवू शकतो किंवा तिचा वापर करू शकतो. संपूर्ण मालमत्तेत प्रत्येक टेनेन्ट इन कॉमनचे वेगवेगळे; परंतु एकसमान हितसंबंध असावेत, हे गरजेचे नाही. संपूर्ण मालमत्तेत प्रत्येकाचे हितसंबंध एकमेकांपेक्षा कमी किंवा अधिक असू शकतात. त्या सर्वांकडे आपापल्या हिश्‍शाच्या हितसंबंधांचे हस्तांतरण अन्य व्यक्तीकडे करण्याचा अधिकार असतो. परंतु त्यांच्याकडे सर्व्हाइव्हरशिपचा अधिकार मात्र नसतो. अशा स्थितीत एखाद्या टेनेन्ट इन कॉमनच्या मृत्यूनंतर त्याच्या हितसंबंधांचे हस्तांतरण त्याच्या मृत्युपत्रानुसार किंवा कायद्यातील तरतुदींनुसार केले जाते. ज्या व्यक्तीच्या नावावर हे हस्तांतरण केले जाते, ती व्यक्ती अन्य सहमालकांसोबत टेनेन्ट इन कॉमन बनते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जॉइन्ट टेनेन्सी : जॉइन्ट टेनेन्सीमध्ये सर्व्हाइव्हरशिपचा अधिकार असतो. एखाद्या जॉइन्ट टेनेन्टचा मृत्यू झाल्यास मालमत्तेतील त्याचा हिस्सा तत्काळ इतर जीवित जॉइन्ट टेनेन्ट्‌सकडे जाऊ शकतो किंवा ते त्या संपूर्ण मालमत्तेवर कब्जा करू शकतात. अर्थात, जॉइन्ट टेनेन्ट्‌स एकमेकांच्या हक्कांचे हनन करू शकणार नाहीत, ही पूर्वअट असते. जॉइन्ट टेनेन्ट्‌सचे हिस्से वेगवेगळे करता येऊ शकत नाहीत आणि ते आपले हिस्से एकत्र करू शकतात. जॉइन्ट टेनेन्सी ही मृत्युपत्राद्वारे किंवा कराराच्या माध्यमातून प्रस्थापित होऊ शकते.

– विनिता शाह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)