मालमत्तेती गुंतवणूक तिप्पट होणार

मालमत्तेत गुंतवणूक करणारी मंडळी दीर्घकाळापासून मंदीचा सामना करत आहेत. नवीन गुंतवणूकदार देखील मंदी आणि बाजारातील सुस्तीमुळे मालमत्तेत गुंतवणूक करण्यास धजावत नव्हते. मात्र मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी आता खूशखबर आहे. एका अहवालानुसार भारतातील मालमत्तेतील गुंतवणूक मूल्य हे येत्या दहा वर्षात तिप्पट होणार आहे. नवी दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद येथील मालमत्तेच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. 2000 पासून मालमत्तेच्या किंमतीला वेग येण्यास प्रारंभ झाला होता.

2008 च्या मंदीने काही प्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र पुन्हा एकदा मालमत्तेच्या किंमतीला वेग येण्याचे वातावरण निर्माण झाले असून त्या आधारावरच मालमत्ता ही काही वर्षांनी लखपती व्यक्तीला कोट्यधीश बनवणारी ठरू शकते. साधारणत: पुण्यात पंधरा वर्षांपूर्वी 12 ते 15 लाखाला घेतलेली मालमत्ता आज 75 ते एक कोटीच्या घरात पोचली आहे. किंमतवाढीचा हा वेग असाच पुढे राहण्याचे वातावरण दिसत आहे.

भारतीय मालमत्ता बाजारातील तेजीचा वेग हा अमेरिका, चीन आणि युरोपिय देशासह अन्य कोणत्याही मोठ्या देशाच्या तुलनेत अधिक आहे. जर आपण आज मालमत्तेच गुंतवणूक करत असाल तर येत्या दहा वर्षात त्याचा दमदार परतावा मिळवू शकतो. इंटरनॅशनल अफ्रेशिया बॅंक तसेच न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार भारतातील मालमत्तेचे मूल्य येत्या दहा वर्षात 200 टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. जर आज एखाद्या मालमत्तेची किंमत एक लाख रुपये असेल तर दहा वर्षानंतर तीन लाख रुपये होईल. विकासाच्या बाबतीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. यादरम्यान चीनमध्ये मालमत्तेतील वाढ ही 180 टक्के राहू शकते.

तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया असून तेथे 70 टक्के वाढीची अपेक्षा केली जात आहे. यादीत चौथ्या स्थानावर जपान, कॅनडा असून तेथे सरासरी मालमत्तेत 30 टक्के वाढ होईल, अशी शक्‍यता आहे. पाचव्या स्थानावर अमेरिका असून तेथे वीस टक्केच वाढ होण्याची शक्‍यता आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स तसेच इटलीत मालमत्तेच्य किंमतीत दहा वर्षात केवळ दहा टक्केच वाढ होणार असल्याचे भाकित संस्थेने केले आहे.

एका अहवालानुसार भारतात 2007 ते 2017 या काळात भारतात मालमत्तेच्या किंमतीत 160 टक्के वाढ झाली आहे. यादरम्यान चीनमध्ये हाच आकडा 198 टक्के, अमेरिकेत 20 टक्के, जपानमध्ये 22 टक्के , इंग्लंडमध्ये दोन टक्के, जर्मनीत शून्य, फ्रान्समध्ये 11 टक्के, कॅनडात 25 टक्के, ऑस्ट्रेलियात 83 टक्के आणि इटलीत 19 टक्के राहिलेला आहे. जगात आजघडीला 2252 जण अब्जाधिश आहेत. डिसेंबर 2017 पर्यंत जगभरातील नागरिकांची खासगी मालमत्ता ही 13,975 लाख कोटी रुपयांची होती. 6.5 कोटीहून अधिक मालमत्ता असणाऱ्या नागरिकांची संख्या जगात 1.52 कोटी आहे. जगात सध्या 2252 अब्जाधिश आहेत आणि प्रत्येकाकडे सरासरी 6500 रुपयांची मालमत्ता आहे.

अमेरिका हे दहा वर्षांनंतरही एकूण संपत्तीत आघाडीवरच राहिल, असे अहवाल म्हणतो. अर्थात या बाबीत ब्रिटन आणि जर्मनीला मागे टाकून भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत देश होईल. यावेळी 5.35 लाख कोटी मालमत्तेसह भारत सहाव्या स्थानावर आहे. सुमारे 40.68 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह अमेरिका अव्वल स्थानावर आहे आणि दहा वर्षांनंतरही आघाडीवरच राहिल, अशी चिन्हे आहेत. अर्थात यादरम्याम अमेरिकेतील मालमत्तेतील वाढीचे प्रमाण हे केवळ 20 टक्केच असणार आहे.

– सतीश जाधव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)